हिरो इलेक्ट्रिक कंपनीने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Eddy लाँच केली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर कमी अंतराच्या प्रवासासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. हिरो इलेक्ट्रिक Eddy चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज भासणार नाही. Eddy इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक नविन वैशिष्ट्ये देण्यात आली आहे. हिरो इलेक्ट्रिकच्या Eddy स्कूटरची एक्स-शोरूम किंमत ७२ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर कंपनीने ही स्कूटर अतिशय साध्या बॉडीसह लाँच केली आहे. असं असलं तरीही Eddy इलेक्ट्रिक स्कूटर दिसायला खूपच आकर्षक दिसते. हिरोने Eddy इलेक्ट्रिक स्कूटर कमी अंतरासाठी डिझाइन केली आहे. तरीही कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स दिले आहेत. Eddy मध्ये इलेक्ट्रिक स्कूटरप्रमाणेच तुम्हाला फिड माय बाईक, ई-लॉक, मोअर बूट स्पेस, फॉलो मी हेडलॅम्प आणि रिव्हर्स मोड यांसारखी अनेक उत्तम वैशिष्ट्ये मिळतील.
हिरो इलेक्ट्रिकनं Eddy स्कूटरचं केलं अनावरण; गाडी चालवण्यासाठी परवान्याची गरज नाही, जाणून घ्या
हिरो इलेक्ट्रिक कंपनीने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Eddy लाँच केली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर कमी अंतराच्या प्रवासासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-03-2022 at 10:28 IST
मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hero electric launch eddy scooter need not driving licence rmt