दुचाकीमध्ये १०० सीसी मायलेज बाइक्सशिवाय, १२५ सीसी बाइक्स उपलब्ध आहेत.यामध्ये होंडा, टीव्हीएस, हिरो आणि बजाज सारख्या कंपन्यांच्या बाइक्स उपलब्ध आहेत. तुम्हालाही मजबूत स्टाइल मायलेज असलेली १२५ सीसी बाईक विकत घ्यायची असेल, तर या विभागातील दोन लोकप्रिय बाइक्सची संपूर्ण माहिती जाणून घ्या. या तुलनेसाठी Hero Glamour 125 आणि Honda SP 125 बाइक्स आहेत, याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
Hero Glamour 125: हिरो ग्लॅमर 125 बाईक कंपनीच्या सर्वाधिक विकल्या जाणार्या बाईकच्या गणनेत येते. कंपनीने नवीन Extec अवतारात सादर केल्या आहेत. आठ प्रकार कंपनीने बाजारात लॉन्च केले आहेत. या बाईकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर यात १२५ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे जे फ्यूल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन १०.८४ पीएस पॉवर आणि १०.६ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ४-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. बाईकच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. बाईकच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ही बाईक ६९.४९ किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते आणि ARAI ने प्रमाणित केले आहे. हिरो ग्लॅमरची सुरुवातीची किंमत ७५,९०० रुपये आहे. त्याच्या टॉप व्हेरिएंटवर ८५,९२० रुपयांपर्यंत जाते.
गाडीचा मायलेज टिकवून ठेवायचा असेल तर या पाच गोष्टी लक्षात ठेवा; मॅकेनिकची गरज भासणार नाही
Honda SP 125: होंडा एसपी 125 ही कंपनीची एक स्टायलिश बाईक आहे. कंपनीने २ प्रकारांसह लॉन्च केली आहे. होंडा एसपी 125 बाईकमध्ये १२४ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे जे फ्युएल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन १०.८ पीएस पॉवर आणि १०.९ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. ४-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. बाईकच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. बाईकच्या मायलेजबद्दल, होंडाचा दावा आहे की ही होंडा एसपी 125 ही गाडी ४२.२ किमीचा मायलेज देते. होंडा एसपी 125 बाईकची सुरुवातीची किंमत ८०,०८६ रुपये असून टॉप व्हेरियंटवर जाताना ८४,०८७ रुपयांपर्यंत जाते.