Electric Cycle: भारतासह जगभरात इलेक्ट्रिक मोबिलिटीवर विशेष भर दिला जात आहे. इलेक्ट्रिक स्कूटर, ई-बाईक आणि इलेक्ट्रिक कार सोबत इलेक्ट्रिक सायकल (Electric Cycle) हे देखील एक महत्वाचे साधन ठरताना दिसत आहेत. सायकल लोकांच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानली जात असते. जर ती इलेक्ट्रिक सायकल असेल तर त्याची मजा काही अधिकच असते. हिरो लेक्ट्रो (Hero Lectro) या लोकप्रिय बाईक निर्माता कंपनीच्या ई-सायकल ब्रँडने गेल्या काही वर्षांत भारतीय बाजारपेठेत एकापेक्षा जास्त इलेक्ट्रिक सायकल लाँच केल्या आहेत, ज्या किंमत, कामगिरी याबाबत उत्कृष्ट आहेत. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत, त्या ई-सायकल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘या’ आहेत हिराेच्या चार दमदार ई-सायकल

Photo-herolectro.com

Hero Lectro C1: ही ई-सायकल चालवणाऱ्यांना आरामदायक आणि सुरक्षित रायडिंगचा अनुभव मिळतो, असं कंपनीचं म्हणणं आहे. या सायकलमध्ये कंपनीने २५०W BLDC मोटर दिली आहे, जी या सायकलच्या मागच्या चाकामध्ये जोडली आहे. ही सायकल दोन कलर व्हेरिएंट्समध्ये येते. या सायकलमध्ये देण्यात आलेली बॅटरी फुल चार्ज केल्यानतर ही सायकल ३० किलोमीटरपर्यंत धावते. या सायकलची किंमत ३२,९९९ रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

Photo-herolectro.com

Lectro c5x: हिरोच्या दुसऱ्या सर्वात शक्तिशाली सायकलपैकी एक म्हणजे Lectro c5x आहे. Hero Lactro C1 च्या तुलनेत त्याची किंमत थोडी जास्त आहे. किंमत तसेच वैशिष्ट्ये आणि श्रेणीच्या तुलनेत ते खूप पुढे आहे. तुम्ही ते फक्त ३८,९९९ मध्ये खरेदी करू शकता. यात लिथियम आयन डिटेचेबल बॅटरी आहे. हे वॉटरप्रूफ असून आता पावसाळ्यात ते सहज चालवता येते. याशिवाय, एकदा चार्ज केल्यानंतर ते सुमारे ३५ किलोमीटरपर्यंत धावू शकते.

Photo-herolectro.com

Hero Lectro F1: ही सायकल २५ किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने धावते. यामध्ये अँटी स्किड अलॉय पेडलसह पुढच्या आणि मागच्या चाकांमध्ये आयएसओ प्रमाणित डिस्क ब्रेक सिस्टिम देण्यात आली आहे. ही सायकल तुम्ही ३८ हजार ९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. यातली बॅटरी एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही सायकल ३० किलोमीटर पर्यंतची रेंज देते.

Hero Lectro F6i: कंपनीच्या सर्वात शक्तिशाली इलेक्ट्रिक सायकल्सपैकी एक म्हणजे Hero Lectro F6i. हे टॉप मॉडेल आहे. पॉवरफुल बॅटरीमुळे ती एका चार्जवर जवळपास ५५ किलोमीटर आरामात चालवता येते. या इलेक्ट्रिक सायकलमध्ये ११.६ Ah पॉवरची बॅटरी देण्यात आली आहे.  या सायकलची किंमत ५४,९९९ रुपये इतकी आहे. ही सायकल यलो आणि ब्लॅक या दोन कलर ऑप्शन्समध्ये येते. 