तुम्ही टू व्हिलर घेण्याच्या विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला देशातील दोन लोकप्रिय बाइक्सची संपूर्ण माहिती जाणून घेता येईल ज्या बाइक कमी बजेटमध्ये उपलब्ध आहेत. तसेच चांगला मायलेजचा दावा करतात. येथे आमच्याकडे तुलना करण्यासाठी Hero HF Deluxe आणि Bajaj CT 100 बाइक्स आहेत, ज्यामध्ये आम्ही या दोन्ही बाईकच्या किंमतीपासून फिचर्स सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Hero HF Deluxe:हिरो एचएफ डिलक्स बाईक ही त्यांच्या कंपनीची लोकप्रिय बाइक आहे. कंपनीने पाच प्रकारांसह लॉन्च केली आहे. या बाईकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल सांगायचे तर, कंपनीने सिंगल सिलेंडर ९२.७ सीसी इंजिन दिले असून फ्युएल इंजेक्शन तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन ८.०२ पीएसची पॉवर आणि ८.०५ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. यात ४-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. बाईकच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर या बाइकच्या दोन्ही चाकांमध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. बाइकच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ही बाईक ८३ किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते आणिARAI ने प्रमाणित केले आहे. हिरो एचएफ डिलस्कची सुरुवातीची किंमत ५२,७०० रुपये आहे. टॉप व्हेरियंटवर ६३,४०० पर्यंत जाते.

सिंगल चार्जमध्ये ३०० किमी धावते ही इलेक्ट्रिक मोपेड बाइक, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj CT 100: बजाज सीटी 100 बाईक ही त्यांच्या कंपनीच्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या बाइक्समध्ये गणली जाते, जी कंपनीने दोन प्रकारांसह बाजारात लॉन्च केली आहे. या बाइकमध्ये कंपनीने १०२ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन दिले असून एअर कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन ७.९ पीएसची पॉवर आणि ८.३४ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. ४-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. बाईकच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल सांगायचे तर, कंपनीने पुढच्या आणि मागील चाकांमध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन दिले आहे. मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही बाईक ७४ किलोमीटर प्रति लीटर मायलेज देत असून ARAI ने प्रमाणित केले आहे. बजाज CT 100 ची सुरुवातीची किंमत५३,६९६ रुपये असून टॉप व्हेरियंटवर जाते तेव्हा वाढते.