किंमत आणि मायलेज पाहून बहुतेक लोक बाइक खरेदी करतात. लोकांची ही निवड लक्षात घेत आज बजाज, हिरो आणि होंडा ते टीव्हीएसने कमी बजेटमध्ये लांब मायलेज असलेल्या बाइक बाजारात आणल्या आहेत. तुम्हालाही कमीत कमी किमतीत लांब मायलेज देणारी बाइक विकत घ्यायची असेल, तर तुम्ही या १०० सीसी सेगमेंटच्या दोन लोकप्रिय बाइक्सची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. या तुलनेत, आज आमच्याकडे Hero HF Deluxe आणि Bajaj CT 100 आहेत. आम्ही तुम्हाला या दोन्हीच्या किंमतीपासून ते वैशिष्ट्यांपर्यंत संपूर्ण तपशील सांगणार आहोत जेणेकरून तुम्ही योग्य पर्याय निवडू शकाल.

Hero HF Deluxe: हिरो एचएफ डिलक्स ही कमी वजनाची मायलेज असलेली बाइक आहे. या गाडीचे चार प्रकार कंपनीने बाजारात लाँच केले आहेत. बाइकमध्ये ९७.२ सीसी सिंगल सिलिंडर इंजिन आहे, जे फ्युएल इंजेक्शन तंत्रज्ञानावर आधारित आहे. इंजित ८ पीएस पॉवर आणि ८.०५ एनएम पीक टॉर्क जनरेट करते आणि ४-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. बाइकच्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये कंपनीने तिच्या पुढील आणि मागील दोन्ही चाकांमध्ये ड्रम ब्रेकचे संयोजन स्थापित केले आहे. हिरो मोटोकॉर्पचा मायलेजबद्दल दावा आहे की, ही बाइक ८३ किमीचा मायलेज देते आणि हा मायलेज ARAI प्रमाणित आहे. हिरो एचएफ डिलक्स बाइकची सुरुवातीची किंमत ५४,६५० रुपये आहे, जी टॉप व्हेरियंटवर जाताना ६३,६०० रुपयांपर्यंत जाते.

Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Honda Laucned Black Edition and Signature Black Edition
Honda Elevate: होंडाची नवीन एलिव्‍हेट ‘ब्‍लॅक एडिशन’ लाँच! पॉवरफुल एसयूव्ही ह्युंदाई क्रेटाशी करणार स्पर्धा; पाहा किंमत अन् जबरदस्त फीचर्स
hero splendor plus price hike
देशात सर्वाधिक विक्री होणारी ‘ही’ बाईक आता महाग; जाणून घ्या नवी किंमत
Game Changer vs Fateh Box Office Collection Day 1
‘गेम चेंजर’ व ‘फतेह’पैकी बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजली? दोन्ही सिनेमांच्या कमाईचे आकडे आले समोर
Tata Motors January Offer
Tata Motors January Discount : ग्राहकांसाठी खुशखबर! टाटा पंच ईव्ही अन् टाटा टियागो ईव्ही वर ८५ हजारांपर्यंत डिस्काउंट, जाणून घ्या सविस्तर
Honda SP 125 vs Bajaj Pulsar N125
Honda SP 125 vs Bajaj Pulsar N125 : कोणती दुचाकी आहे लयभारी? फिचर्सपासून किंमतीपर्यंत; जाणून घ्या, एका क्लिकवर
Car Tyre Tips
‘या’ सोप्या टिप्स लक्षात घेतल्यास कार आणि बाईकचा टायर चालेल दीर्घकाळ

Simple One vs Ola S1: किंमत, हायटेक फिचर्स आणि रेंजबाबत जाणून घ्या

Bajaj CT 100: बजाज सीटी १०० बाईक कंपनीच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या बाइकच्या यादीत येते. एकाच प्रकारात कंपनीने लाँच केली आहे. या बाइकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल सांगायचे तर, कंपनीने १०२ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे जे एअर-कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन ७.९ पीएसची कमाल पॉवर आणि ८.३४ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. ४ स्पीड गिअरबॉक्स आहे. बाइकच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल सांगायचे तर, कंपनीने तिच्या पुढच्या आणि मागील चाकांमध्ये ड्रम ब्रेक्स बसवले आहेत. यात अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत. मायलेजबद्दल, बजाज ऑटोचा दावा आहे की ही बाईक ७४ किमीचा मायलेज देते आणि हा मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. बजाज सीटी १०० बाइकची सुरुवातीची किंमत ५३,६९६ रुपये (एक्स-शोरूम) आहे, जी ऑन-रोड असताना ६४,८६७ रुपयांपर्यंत जाते.

Story img Loader