भारतीय वाहन बाजारात गेल्या दोन वर्षांपासून इलेक्ट्रिक वाहनांसाठी मागणी वाढली आहे. इलेक्ट्रिक वाहनांचं सेगमेंटदेखील मोठ्या प्रमाणात विस्तारलं आहे. त्याचबरोबर भारतीय बाजारात अनेक इलेक्ट्रिक सायकल देखील उपलब्ध आहेत. तुम्ही जर एखादी इलेक्ट्रिक सायकल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे. हिरोने बाजारात इलेक्ट्रिक सायकल लाँच केल्या आहेत. Hero Lectro e-cycle ने त्याचे Lectro H3 आणि Lectro H5 हे दोन मॉडेल लॉन्च केले आहेत. हे GEMTEC समर्थित असून दोन्ही सायकल एका चार्जमध्ये ३० किमी पर्यंतची रेंज देत आहेत.

दोन्ही हिरो लेक्ट्रो इलेक्ट्रिक सायकलमध्ये काय असेल खास?

नवीन Hero Lectro H3 आणि H5 e-cycles मध्ये एलईडी डिस्प्ले आहे.आणि २५०W BLDC रीअर हब मोटरद्वारे समर्थित आहे, २५ kmph चा कमाल वेग गाठण्यास सक्षम आहे. याव्यतिरिक्त, ३० किमीची श्रेणी ऑफर करण्यासाठी चार तासांमध्ये पूर्ण चार्ज होण्यास सक्षम असलेली IP67 Li-ion ५.८Ah इनट्यूब बॅटरी आहे. जी ४ तासांत पूर्ण चार्ज होते. जेव्हा ही इलेक्ट्रिक सायकल पूर्णपणे चार्ज केली जाते, तेव्हा ती ३० किमीपर्यंत चालवता येते.

आणखी वाचा : अरे वा! ५०,००० रुपयात घरी आणा जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर; चालवण्यासाठी भासणार नाही ड्रायव्हिंग लायसन्सची गरज

Hero Lectro e-cycle चे H3 मॉडेल दोन रंगांच्या पर्यायांसह उपलब्ध आहे. यामध्ये पहिला रंग ब्लिसफुल ब्लॅक-ग्रीन आणि दुसरा कलर ब्लेझिंग ब्लॅक-रेडमध्ये उपलब्ध आहे. H5 मॉडेल ग्रूवी ग्रीन आणि ग्लोरियस ग्रे दोन रंगांच्या पर्यायांसह बाजारात उपलब्ध आहेत.

काय आहे किंमत ?

हिरो कंपनीने H3 मॉडेलची किंमत रु.२७,४९९ आणि H5 मॉडेलची किंमत रु.२८,४९९ ठेवली आहे. नवीन GEMTEC युनिट्सचा लाभ त्यांच्या D2C वेबसाइटद्वारे तसेच Hero Lectro च्या ६००+ डीलर्सच्या नेटवर्कद्वारे, ई-कॉमर्स चॅनेल आणि दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमधील विशेष अनुभव केंद्रे आणि झोनमधून तुम्हाला घेता येणार आहे.

Story img Loader