हिरो सायकलच्या ई-सायकल ब्रँड हिरो लेक्ट्रोने तीन नवीन ई-सायकल बाजारपेठेत सादर केल्या आहेत. आपला C आणि F-सिरीज पोर्टफोलिओ पुढे नेत, कंपनीने C1, C5x आणि F1 नावाच्या तीन ई-सायकल लाँच केल्या आहेत. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, या तिन्ही सायकल्स ३२,९९९ रुपये ते ३८,९९९ रुपयांच्या किंमतीच्या रेंजमध्ये सादर केल्या गेल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्याच वेळी, नवीन इलेक्ट्रिक सायकल अशा प्रकारे डिझाइन केली गेली आहे की सायकल वापरणाऱ्याला शहरातील आणि ऑफ रोडवर सर्वोत्तम अनुभव मिळेल. यासोबतच सायकलमध्ये अॅल्युमिनियम ६०६१ अलॉय व्हील फ्रेम्स देण्यात आल्या आहेत. ज्याच्या मदतीने ही सायकल खूप शक्तिशाली बनते. चला, ई-सायकलचे तपशील जाणून घेऊया.

ई-सायकलची रेंज

जर आपण या तीन मॉडेल्सच्या रेंजबद्दल बोललो तर कंपनीचा दावा आहे की हीरो लेक्ट्रो इलेक्ट्रिक सायकल ३० किलोमीटरपर्यंतची रेंज मिळवू शकते. म्हणजेच हे इलेक्ट्रिक सायकल एका चार्जवर नक्कीच २५ ते ३० किलोमीटर चालेल. यासोबतच, ई-सायकलमध्ये काही चांगले बदल करण्यात आले आहेत, ज्याच्या मदतीने सी१  मॉडेलला उत्तम अर्गोनॉमिक्स मिळते. त्याच वेळी, तिन्ही सायकल अँटी-स्किड अलॉय पेडल्स, एरोडायनॅमिक फोर्क्स आणि IP६७ आणि IP६५ डस्ट आणि वॉटरप्रूफ रेटिंगसह येतात.

(आणखी वाचा : बाजारपेठेत दाखल झाली TVS ची नवीन Jupiter Classic स्कूटर; बघा खास फीचर्स )

ई-सायकलची बॅटरी

हीरो लेक्ट्रोच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरमध्ये सर्व इलेक्ट्रिक सायकल बनवण्यात आली आहे. नवीन Hero Lectro C1, C5X आणि F1 सायकल RFID की लॉकिंग, LED डिस्प्ले, ड्युअल वॉल अलॉय व्हीलसह येतात. त्याच वेळी, सायकलमध्ये २५०W BLDC रियर हब मोटर्स आणि हाय पॉवर Li-ion बॅटरी वापरली गेली आहेत.

याशिवाय, नवीन ई-सायकलला नेहमीच्या पॉवर सॉकेटसह एक सुसंगत पोर्टेबल चार्जर मिळतो, परंतु C5x मॉडेल वेगळे करण्यायोग्य Li-ion बॅटरीसह येते, ज्यामुळे सायकल चार्ज करणे आणि बॅटरी स्वॅप करणे नेहमीपेक्षा सोपे होते.

येथे खरेदी करता यईल ई-सायकल

Hero Lectro e-bikes Hero Lectro D2C संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, तर ग्राहक ६०० हून अधिक डीलर्ससह हिरो लेक्ट्रो ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून ही ई-सायकल खरेदी करू शकतात. यासोबतच दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई येथील खास अनुभव केंद्रांवरूनही सायकल खरेदी करता येणार आहे.