हिरो सायकलच्या हिरो लेक्ट्रो इलेक्ट्रिक सायकल विभागने दोन नवीन इलेक्ट्रिक माउंटन सायकल एफ 2 आय आणि एफ 3 आय लाँच केल्या आहेत. कंपनीने एफ 2 आयची किंमत ३९,९९९ रुपये आणि एफ ३ आयची किंमत ४०,९९९ रुपये निश्चित केली आहे. शहरी ट्रॅक तसेच ऑफ-रोड ट्रॅकवर आरामदायी राइडिंगचा अनुभव देण्यासाठी ई सायकलची बांधणी करण्यात आली आहे. कंपनीला या सायकल्सद्वारे तरुण रायडर्सना आकर्षित करायचे आहे. हिरो एफ २ आय आणि हिरो एफ ३ आय या दोन्ही सायकल पूर्ण चार्ज केल्यावर ३५ किमीपर्यंतची रेंज देतात. सर्व प्रकारच्या रायडिंग मोडची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ७ स्पीड गीअर्स, १०० मिमी सस्पेंशन,२७.५ इंच आणि २९ इंच ड्युअल अलॉय रिम आणि ड्युअल डिस्क ब्रेकसह सुसज्ज आहेत.
हिरो लेक्ट्रोची ई-एमटीबी ही माउंटन-बाइकिंग सेगमेंटमधील देशातील पहिली कनेक्टेड ई-सायकल असल्याचा दावा केला जात आहे. ब्लूटूथ आणि स्मार्टफोन अॅप कनेक्टिव्हिटीसह सुसज्ज आहेत, ज्यामुळे रायडर्स कधीही त्यांच्या राइडबाबत माहिती मिळवू शकतात. तसेच ई सायकल RFID बाईक लॉकने संरक्षित आहेत.
दोन्ही माउंटन ई-सायकल उच्च क्षमतेच्या ६.४ एएच आयपी ६७ रेटेड वॉटर आणि धूळ प्रतिरोधक बॅटरीने सुसज्ज आहे. २५० वॅट बीएलडीसी मोटरमधून उच्च टॉर्क निर्माण करते. यामध्ये रायडर्सना चार मोड मिळतात. पेडेलेक ३५ किमीच्या रेंजसह, थ्रॉटल २७ किमीच्या रेंजसह, क्रूझ कंट्रोल आणि मॅन्युअल असे चार मोड आहेत. सायकलवरील स्मार्ट एलईडी डिस्प्ले वापरून एका मोडमधून दुसऱ्या मोडवर स्विच करता येते.