Hero MotoCorp hike prices : Hero MotoCorp ही जगातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी आहे. स्वस्त आणि चांगल्या गुणवत्तेमुळे दुचाकी उत्पादक क्षेत्रात हिरोचा दबदबा पाहायला मिळतो. नवनवीन दुचाकी बाजारात आणत Hero MotoCorp ग्राहकांचे लक्ष वेधून घेतात. सध्या Hero MotoCorp एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. Hero MotoCorp दुचाकीच्या किंमतीमध्ये वाढ करणार आहे. आता तु्म्हाला प्रश्न पडला असेल दुचाकी किती रुपयांनी महागणार? याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.

१ जुलैपासून Hero MotoCorp च्या दुचाकी महागणार

Hero MotoCorp कंपनी त्याच्या निवडक दुचाकी मॉडेलच्या किमतीमध्ये पुढील महिन्यात १ जुलै २०२४ पासून १५०० रुपयांपर्यंत वाढ करणार असल्याची माहिती समोर आली आहे. उत्पादन खर्च जास्त असल्याने हे पाऊल कंपनीला उचलावे लागल्याचे Hero MotoCorp ने सांगितले. त्यामुळे दुचाकीवर १५०० रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. वेगवेगळ्या मॉडेलनुसार आणि बाजारातील किमतीनुसार वाढीमध्ये भिन्नता दिसून येईल. जर तुम्हाला Hero MotoCorp कंपनीची दुचाकी खरेदी करायची असेल तर आजच खरेदी करा. १ जुलैनंतर तुम्हाला खरेदी करताना जास्त किंमत मोजावी लागू शकते.

हेही वाचा : Ola Scooter Offers : ओला स्कूटरवर बंपर ऑफर, S1 सिरीजवर १५ हजार रुपयांपर्यंत सूट; फक्त दोन दिवस बाकी

१ जुलैपासूनटाटा मोटर्सच्या वाहनांच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ होणार

टाटा मोटर्स सुद्धा १ जुलै २०२४ मालवाहतूक किंवा व्यावसायिक वाहनांच्या किमती दोन टक्क्यांनी वाढवणार आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. टाटा मोटर्सने १९ जून रोजी सांगितले की व्यावसायिक वाहनांच्या किंमती वाढ होणार आहे. वेगवेगळ्या मॉडेल्स नुसार किमतीमध्ये भिन्नता दिसून येईल.

हेही वाचा : बजाज या तारेखाला लॉन्च करणार देशाची पहिली CNG बाईक? इंजिनपासून फ्युल कॉस्टपर्यंत काय आहेत वैशिष्ट्ये, जाणून घ्या

देशात हिरोच्या दुचाकीला मोठी मागणी

भारतात हिरोच्या दुचाकीला मोठी मागणी आहे. हिरोच्या नवनवीन मॉडेलची नेहमीच चर्चा असते. २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण ५६ लाख २१ हजार ४५५ दुचाकींची विक्री झाली आहे. यामध्ये देशांतर्गत विक्री आणि निर्यात या दोन्हींचा समावेश होतो. आर्थित वर्ष २०२४ च्या चौथ्या तिमाहीत कंपनीच्या विक्रीत १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच, Hero MotoCorp च्या जागतिक व्यवसायात देखील संपूर्ण आर्थिक वर्षात १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.