प्रसिद्ध बाईक उत्पादक कंपनी Hero MotoCorp ही केवळ भारतातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी नाही तर जगातील सर्वात मोठी स्कूटर आणि मोटारसायकल उत्पादक कंपनी आहे. Hero Motocorp ने स्वस्त आणि चांगल्या प्रोडक्शनच्या आधारे भारतातील तसेच जगभरातील दुचाकी बाजारात सर्वाधिक ओळख निर्माण केली आहे. इंडियन टू-व्हीलर मार्केटमध्ये तर हिरोचाच दबदबा आहे. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून सर्वाधिक मार्केट शेअरसह ही नंबर-१ टू-व्हिलर बनली कंपनी आहे. भारतीय बाजारपेठेत हिरोच्या बाईकची मागणी वाढली असून विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. भारतातील दिग्गज टू-व्हीलर कंपनी हीरो मोटोकॉर्प बाजारपेठेत नवनव्या बाईक लाँच करत असते. आता कंपनीने भारतीय बाजारात मोठा धमाका केला आहे. कंपनीने आपली नवीन बाईक देशातील बाजारात दाखल केली आहे.

देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक Hero Motocrop ने आपल्या लोकप्रिय स्कूटर Xoom 110, कॉम्बॅट एडिशनची नवीन आवृत्ती लाँच करून आपल्या स्कूटर प्रोफाइलचा विस्तार केला आहे. Hero Xoom Combat Edition या सेगमेंटमधील सर्वात महागड्या स्कूटरपैकी ही एक आहे. आज आपण हिरो Xoom च्या या नव्या मॉडेलचे खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात…

17th November Latest Petrol Diesel Price
Petrol Diesel Price In Maharashtra : कुठे स्वस्त तर कुठे महाग, तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घ्या
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग
Daily Petrol Diesel Price
Daily Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरांत काय आहे दर?
pinaka rocket system france
भारताच्या ‘पिनाका’ रॉकेट लाँचर्सची मागणी जगभरात; कारण काय? काय आहेत याची वैशिष्ट्ये?
Raigad Chi Waghin | Viral Video
VIDEO : रायगडची वाघीन! शिवप्रेमीची दुचाकी एकदा पाहाच, व्हिडीओ होतोय व्हायरल
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…

इंजिन आणि पॉवर

नवीन Xoom ही एक स्टाइलिश स्कूटर आहे जी तरुणांना लक्ष्य करते. कंपनी नवीन एडिशनद्वारे आपली विक्री वाढवण्याचा प्रयत्न करेल. कंपनीने या स्कूटरच्या इंजिनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. नवीन Xoom मध्ये ११०.९० cc एअर-कूल्ड इंजिन आहे जे ८.०५ bhp आणि ८.७० Nm टॉर्क जनरेट करते. उत्तम ब्रेकिंगसाठी कंपनी या स्कूटरमध्ये १२ इंची चाके देत असून या स्कूटरमध्ये १९०mm फ्रंट डिस्क ब्रेक आणि १३०mm ड्रम ब्रेकची सुविधा असेल.

(हे ही वाचा : मायलेज २५.७५ किमी; ‘या’ ५ सीटर कारनं केलं सर्वाचं मार्केट जाम! Wagon R ला ही टाकलं मागे, देशात तुफान मागणी, किंमत…)

Hero Xoom Combat Edition वैशिष्ट्ये

Hero Xoom च्या नवीन आवृत्तीमध्ये मोठ्या आकाराची चाके आहेत. यात कॉर्नर बेंडिंग लाइट्स असतील जे वळताना खूप उपयुक्त ठरतील. नवीन आवृत्तीमध्ये नवीन डिजिटल स्पीडोमीटर असेल ज्यामध्ये स्मार्टफोन ब्लूटूथद्वारे कनेक्ट केला जाऊ शकतो. यामध्ये तुम्हाला कॉलर आयडी आणि एसएमएसची माहिती मिळेल. यासोबतच, मोबाईल फोन चार्ज करण्यासाठी ग्लोव्ह बॉक्समध्ये एक यूएसबी पोर्ट देखील उपलब्ध असेल.

Hero Xoom थेट Honda Activa, Honda Dio आणि TVS Jupiter शी स्पर्धा करेल. ज्यांना स्कूटरमध्ये पॉवर, स्टाइल आणि प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत अशा रायडर्सना लक्षात घेऊन Hero Xoom ची रचना करण्यात आली आहे. ही स्कूटर तरुणांना लक्ष्य करते.

दिल्लीत या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत ८०,९६७ रुपये आहे. ही स्कूटर जेट फायटर ग्राफिक्ससह लॉन्च करण्यात आली आहे.  ग्रे आणि काळ्या अशा मिक्स रंगात ही स्कूटर सादर झाली आहे.