मायलेजच्या बाबतीत हिरोच्या दुचाक्यांना लोकांची अधिक पसंती आहे. या कंपनीच्या दुचाकींची किंमतही माफक असते. मात्र तुम्ही जर आता सणासुदीच्या काळात हिरो कंपनीच्या बाईक घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. हिरो मोटोकॉर्पने आपल्या वाहनांच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे.
कंपनीने गुरुवारपासून वाहनांच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे. वाहनांच्या किंमतीमध्ये एक हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. वाढत्या खर्चामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे अहवलांमधून समोर आले आहे. गुरुवारपासून नवीन किंमती लागू झाल्या आहेत.
(टाटाच्या ‘या’ ईव्हीमध्ये मिळणार हे भन्नाट फिचर, ब्रेक मारताच चार्ज होईल कार, जाणून घ्या..)
२०२२ मध्ये तिसऱ्यांदा वाढवली किंमत
वस्तूंच्या किंमतीत वाढ आणि पुरवठा साखळीतील समस्या हे ऑटो क्षेत्रासाठी चिंतेचे कारण बनले आहे. त्यामुळे वाहन कंपन्या सातत्याने दरवाढ करत आहेत. हिरो मोटोकॉर्पने या वर्षी आतापर्यंत तिसऱ्यांदा किंमती वाढवल्या आहेत. कंपनीने जुलै आणि जानेवारीमध्ये देखील वाहनांच्या किंमती वाढवल्या होत्या. तिन्ही वेळची वाढ मिळून आतापर्यंत एकूण ६ हजार रुपयांची वाढ झाली आहे.
७ ऑक्टोबरला लाँच करणार पहिली ईव्ही
हिरो मोटर पुढील महिन्यात आपला पहिला इलेक्ट्रिक स्कुटर लाँच करणार आहे. ७ ऑक्टोबरला हा स्कुटर लाँच होण्याची शक्यता आहे. स्कुटरची किंमत १ लाखांपर्यंत असण्याची शक्यता आहे. स्कुटर टीव्हीएस आयक्यूब, बजाज चेतक, ओला एस १ ला आव्हान देईल.