Hero Motocorp Launches Retail Finance Carnival : २०२१ वर्ष संपत आलं आहे आणि कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रिटेल फायनान्स कार्निव्हल सुरू केलं आहे. हे आजपासून सुरू होत आहे आणि ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत राहणार आहे. Hero MotoCorp या जगातील सर्वात मोठ्या दुचाकी उत्पादक कंपनीने आपल्या संभाव्य खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी खास ऑफर लाँच केली आहे. कार्निव्हलमुळे देशातील विविध विभागातील ग्राहकांना फायनान्सवर सहज वाहने खरेदी करता येणार आहेत. याअंतर्गत ग्राहकांना झीरो डाउन पेमेंट, रेट ऑफ इंटरेस्‍ट आणि झीरो प्रोसेसिंग फी अशा सुविधा मिळणार आहेत.

Hero MotoCorp ने एक आधार कार्डवरून कर्जाची योजना देखील सुरू केली आहे, ज्या अंतर्गत ग्राहकांना वाहन खरेदी करताना फायनान्ससाठी त्यांचे आधार कार्ड दाखवणं आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, ते कार्निव्हल ग्राहकांना किसान हप्ता, नो हायपोथेकेशन आणि इतर सुविधा (बँकेच्या चेकशिवाय) सारखी विशेष फायनान्शियल प्रोडक्‍ट्स देखील ऑफर करत आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी, ग्राहक Hero MotoCorp च्या अधिकृत डीलरशिपला भेट देऊ शकता.

आधार कार्डवर मिळणार कर्ज
Hero MotoCorp ने आधार आधारित कर्ज योजना देखील सुरू केली आहे, ज्या अंतर्गत ग्राहकांना वाहन खरेदी करताना फक्त आधार कार्ड दाखवायचं आहे. वर्षाच्या शेवटी फेस्टिव्हल मूडमध्ये ग्राहकांचा उत्साह आणखी वाढवण्यासाठी, रिटेल फायनान्स कार्निव्हलच्या माध्यमातून Hero MotoCorp कंपनीने अनेक नवीन आणि रोमांचक रिटेल वित्त योजना आणल्या आहेत. या उपक्रमाद्वारे, कंपनीचे उद्दिष्ट विविध क्षेत्रांतील ग्राहकांसाठी रिटेल फायनान्समध्ये प्रवेश, उपलब्धता, जागरूकता आणि नावीन्यपूर्णतेला प्रोत्साहन देण्याचं आहे.