भारतीय बाजारात इलेक्ट्रॉनिक वाहनांची वाढती मागणी पाहता हिरो मोटोकॉर्प कंपनीने कंबर कसली आहे. हिरो मोटोकॉर्प इलेक्ट्रॉनिक प्रोजेक्टवर गेल्या काही महिन्यांपासून वेगाने काम करत आहे. हिरो मोटोकॉर्पने एप्रिल २०२१ मध्ये इलेक्ट्रिक स्कूटरची पहिली झलक दाखवली होती. आता हिरो मोटोकॉर्प मार्च २०२२ मध्ये आपली पहिली इव्ही टू व्हिलर लॉन्च करणार आहे. हिरो इव्हीचं प्रोडक्शन आंध्र प्रदेशच्या चित्तूरमध्ये करत आहे. तसेच हिरो मोटोकॉर्पने बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान आणि काही फिचर्ससाठी ताइवानची कंपनी गोगोरोसोबत करार केला आहे. हिरो मोटोकॉर्पच्या पहिल्या इव्ही दुचाकीची बजाज चेतक इलेक्ट्रिक, एथर 450X आणि TVS iQube, (Bjaj Chetak Electric, Ather 450X आणि TVS iQube,) Ola S One सारख्या स्कूटरशी स्पर्धा असेल.
हिरो मोटोकॉर्प या इव्ही स्कूटरची किंमत १ लाखाच्या आता ठेवण्याची शक्यता आहे. या किमतीतील टू व्हिलर्स भारतात मोठ्या संख्येने खरेदी केल्या जात असल्याचं कंपनीतील अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. “वाहतुकीच्या भविष्याकडे धोरणात्मक दृष्टीकोनातून पाहणं आवश्यक आहे. हिरो मोटोकॉर्प हळूहळू कार्बनमुक्त मार्गावर काम करत आहे. तसेच नवीनवीन गाड्यांवर काम करत आहे. हरित वाहने बनवण्यासाठी व्यापक संशोधन करून काम करत आहे.”, असं मोटोकॉर्पचे सीएफओ निरंजन गुप्ता यांनी सांगितलं.
पोर्शेच्या Taycan EV आणि Macan Facelift गाड्या भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
दुसरीकडे जपानी कंपनी सुझुकीनेही आपलं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. सुझुकी आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर Suzuki Burgman Electricपुढील आठवड्यात १८ नोव्हेंबर रोजी लॉन्च करणार आहे. बूम मोटर्सने कॉर्बेट ईव्ही ही इलेक्ट्रिक स्कूटरही लॉन्च केली आहे. ही देशातील सर्वात मजबूत इलेक्ट्रिक स्कूटर असल्याचा कंपनीचा दावा आहे.