Hero MotoCorp ने नुकतीच देशात Karizma XMR 210 नवीन अवतारात देशात दाखल केली आहे. ही बाईक ग्राहकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. Karizma XMR ला आतापर्यंत १३,६८८ बुकिंग मिळाले असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. या बाईकची वाढती मागणी पाहता कंपनीने डीलरशिपपर्यंत गाड्या पाठवण्यास सुरुवात केली असून आता ग्राहकांना बाईकची डिलिव्हरी या महिन्याच्या अखेरीसपर्यंत होण्याची शक्यता आहे.
Karizma XMR 210 या बाईकमध्ये काय आहे खास?
Hero MotoCorp ने अलीकडेच Karizma XMR लाँच केले आहे. आकर्षक डिझाईन, चांगले फीचर्स आणि चांगली कामगिरी यामुळे बाईकला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. नवीन Karizma XMR नवीन लिक्विड-कूल्ड, २१०cc, सिंगल-सिलेंडर इंजिनसह येते जे २५.५bhp आणि २०.४Nm पॉवर निर्माण करते. इंजिन ६-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे, जे स्लिप आणि असिस्ट क्लचसह येते. नवीन स्टील ट्रेलीस फ्रेमवर आधारित असून नवीन बाईकमध्ये टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क आणि मागील बाजूस प्रीलोड अॅडजस्टेबल मोनोशॉक आहे.
(हे ही वाचा : बाकी कंपन्यांचे उडाले होश, E20 पेट्रोलवरही धावणारी Yamaha ची नवी स्कूटर देशात दाखल, किंमत फक्त… )
Karizma XMR 210 वैशिष्ट्ये
ब्रेकिंग सिस्टीमसाठी, मोटरसायकलमध्ये ३०० मिमी फ्रंट आणि २४० मिमी मागील डिस्क तसेच ड्युअल-चॅनल एबीएस मानक आहेत. हे आयकॉनिक यलो, मॅट फँटम ब्लॅक आणि टर्बो रेड या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. नवीन Karizma XMR सेगमेंट-फर्स्ट अॅडजस्टेबल विंडशील्ड, इंटेलिजेंट इलुमिनेशन हेडलॅम्प आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनने सुसज्ज आहे.
किमतीत वाढ
या बाईकचे बुकिंग २९ ऑगस्ट २०२३ रोजी सुरू झाले आणि ३० सप्टेंबर २०२३ रोजी बंद झाले. त्यानंतर, Karizma XMR 210 बाईक ७,००० रुपयांनी महाग झाली आणि आता ती १,७९,९०० रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) च्या किमतीत उपलब्ध आहे.