Hero Motocorp Splendour Plus Records Highest Sales: प्रसिद्ध बाईक उत्पादक कंपनी Hero MotoCorp ही केवळ भारतातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी नाही तर जगातील सर्वात मोठी स्कूटर आणि मोटारसायकल उत्पादक कंपनी आहे. Hero Motocorp ने स्वस्त आणि चांगल्या प्रोडक्शनच्या आधारे भारतातील तसेच जगभरातील दुचाकी बाजारात सर्वाधिक ओळख निर्माण केली आहे. इंडियन टू-व्हीलर मार्केटमध्ये तर हिरोचाच दबदबा आहे. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून सर्वाधिक मार्केट शेअरसह ही नंबर-१ टू-व्हिलर कंपनी बनली आहे. भारतीय बाजारपेठेत हिरोच्या बाईकची मागणी वाढली असून विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. अशातच आता समोर आलेल्या रिपोर्टनुसार यावेळीही Hero MotoCorp च्या स्प्लेंडर प्लस बाईक्सची सर्वाधिक विक्री झाली आहे.

फक्त ३० दिवसांत २.९४ लाख लोकांनी खरेदी ही बाईक

Dhananjay munde
Dhananjay Munde : खातेवाटप जाहीर झाल्यानंतर धनंजय मुंडे यांची पोस्ट चर्चेत; म्हणाले,”मी…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Top 5 best budget cars with 6 airbags
‘या’ आहेत सहा एअरबॅग असलेल्या टॉप ५ सर्वोत्तम बजेट कार, जाणून घ्या किंमत अन् खास फिचर्स
Shocking video dehradun raipur two girls fight for boy friend video viral on social media
कपडे फाटले तरी त्या थांबल्या नाही; एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “अरे गप्प बसा ना बाबा”, खाते वाटपाबाबत प्रश्न विचारताच अजित पवार संतापले
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…

हिरोच्या सर्वात पॉप्यूलर बाईक स्प्लेंडर प्लसला इंडियन मार्केटमध्ये जबरदस्त मागणी आहे. ह्या बाईकला ३० वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी याची क्रेझ कमी झालेली नाही. हिरो स्प्लेंडरने गेल्या महिन्यात एकूण २,९३,८२८ गाड्या विकल्या. या बाईकची किंमत ७५ हजार रुपयांपासून सुरू होते.

होंडा शाइन दुसऱ्या क्रमांकावर

होंडा शाइन दुसऱ्या क्रमांकावर आहे, जीचे गेल्या गेल्या महिन्यात १,२५,०११ युनिट्स सेल झाले. नंतर बजाज पल्सर आहे जीचे गेल्या महिन्यात १,१४,४६७ युनिट्स सेल झाले आहेत.

इंजिनही पॉवरफूल

हिरो स्प्लेंडर प्लस ही ७०-८० kmpl च्या मायलेजसह बाजारातील सर्वात जास्त इंधन-कार्यक्षम बाइक्सपैकी एक आहे. ९७.२cc इंजिनद्वारे समर्थित, ते उर्जा आणि इंधन कार्यक्षमतेमध्ये परिपूर्ण संतुलन देते. हे ८,००० RPM वर ७.९ bhp आणि ६,००० RPM वर ८.०५ Nm चे पीक टॉर्क जनरेट करते. यात हिरोची i3S निष्क्रिय स्टार्ट/स्टॉप सिस्टीम देखील मिळते, त्यामुळे मायलेज वाढवण्यास मदत करते. यात टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस ड्युअल स्प्रिंग-लोडेड शॉक शोषक आहेत.ज्यामुळे ही बाईक दैनंदिन प्रवासाकरिता एक उत्तम पर्याय ठरते.

हेही वाचा >> Bajaj Chetak: भारतीयांचं पहिलं प्रेम! सर्वात स्वस्त आणि मस्त ‘चेतक’ इलेक्ट्रीक स्कूटर भारतात लॉन्च, सिंगल चार्जमध्ये १५३ KM पळणार

फीचर्सही जबरदस्त

या बाईकमध्ये ब्लूटूथ, कॉल, एसएमएस आणि बॅटरी अलर्टची सुविधा आहे. एवढेच नाही तर यात एक यूएसबी पोर्ट असेल ज्यामध्ये तुम्ही तुमचा फोन चार्ज करू शकता. याच्या फ्रंट आणि रिअर टायरमध्ये ड्रम ब्रेकची सुविधा असेल, याशिवाय यात एलईडी टेललाइट आणि हेडलाइट आहे.

Story img Loader