Hero MotoCorp’s Mavrick 440 Thunderwheels : हिरो मोटो कॉर्प (Hero MotoCorp) ही भारतीय दुचाकी वाहन निर्माती कंपनी आहे. ही कंपनी केवळ भारतातील सर्वांत मोठी दुचाकी कंपनी नाही, तर जगातील सर्वांत मोठी स्कूटर व मोटरसायकल उत्पादक कंपनी आहे. तर, आता कंपनी त्यांच्या फ्लॅगशिप मोटरसायकलचे स्पेशल व्हर्जन तुमच्यासमोर सादर करणार आहे. जर तुम्हाला ही फ्लॅगशिपमोटारसायकल खरेदी करायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला थम्‍स अप स्कॅन करावे लागेल, हे वाचून थक्क झालात ना? पण, हे खरं आहे. Hero MotoCorp आणि Coca-Cola कंपनीने नवीन फ्लॅगशिप मोटरसायकल सादर करण्यासाठी पार्टनरशिप केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Hero MotoCorp च्या फ्लॅगशिप मोटरसायकलचे नाव मॅव्‍हरिक 440 थंडरव्‍हील्‍स (Mavrick 440 Thunder wheels), असे आहे. या मोटरसायकलमध्ये दोन्ही ब्रॅण्डचे ग्राफिक्स, रंग तुम्हाला दिसून येतील.

मॅव्‍हरिक ४४० थंडरव्‍हील्‍स तुम्हाला कशी मिळविता येईल?

थम्स अपने एक प्रोमो पॅक लाँच केला आहे; ज्यात थम्स अपवर लेबलच्या मागे एक अद्वितीय क्यूआरकोड असेल, जो स्कॅन करणे आवश्यक आहे. थम्स अप खरेदीदाराला स्पर्धेत भाग घेण्यासाठी तो कोड टाकावा लागेल. ही लिमिटेड एडिशन मोटरसायकल केवळ १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत थम्स अपचे स्पेशल एडिशन पॅक खरेदी करून, स्कॅन करणाऱ्या ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे.

हेही वाचा…Skoda SUV: Skoda च्या ‘या एसयूव्हीमध्ये रिव्हर्स घेण्यासाठी असणार खास फीचर; वाचा भारतात कधी लाँच होणार

फायनान्शियल एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुर, मॅव्‍हरिक ४४० थंडरव्‍हील्‍स स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी पुढील स्टेप्स फॉलो करा…

१. थम्स अप चार्ज केलेला प्रोमो पॅक खरेदी करा.
२. लेबलच्या मागील क्यूआर कोड स्कॅन करा.
३. मोबाईल नंबर रजिस्टर करा.
४. QR कोड स्कॅन केल्यानंतर युनिक आयडी एंटर करा.
५. विजेत्याला लिमिटेड एडिशन हीरो मॅव्‍हरिक ४४० थंडरव्‍हील्‍स मिळेल.

मॅव्‍हरिक ४४०, हार्ले-डेव्हिडसन एक्स ४४० सह प्लॅटफॉर्म शेअर करीत आहे; त्यात ४४० सीसी एअर-ऑइल कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन ६००० आरपीएमवर २७ बीएचपी आणि ४००० आरपीएमवर ३६ एनएम टॉर्क देते. त्यामध्ये स्लीपर क्लचसह ६ स्पीड गिअरबॉक्स आहेत. त्याचप्रमाणे बाईकची रचना एक ट्रेलीस फ्रेम आहे, ज्यामध्ये १३० मिमी प्रवासासह ४३ मिमी फ्रंट टेलिस्कोपिक फॉर्क्स, १३० मिमी मागील ट्विन शॉक सस्पेन्शन आहे. १७ इंच व्हील्सवर चालणाऱ्या या बाइकमध्ये ३२० मिमी फ्रंट डिस्क ब्रेक व २४० मिमी मागील डिस्क ब्रेक असणार आहे. या फ्लॅगशिप मोटरसायकलची किंमत १.९९ लाख रुपयांपासून सुरू होऊन, २.२४ लाखांपर्यंत (एक्स-शोरूम) असणार आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hero motocorp teamed up with thums up under the coca cola company for mavrick 440 thunderwheels flagship motorcycle limited edition asp