प्रसिद्ध बाईक उत्पादक कंपनी Hero MotoCorp ही केवळ भारतातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी नाही तर जगातील सर्वात मोठी स्कूटर आणि मोटारसायकल उत्पादक कंपनी आहे. Hero Motocorp ने स्वस्त आणि चांगल्या प्रोडक्शनच्या आधारे भारतातील तसेच जगभरातील दुचाकी बाजारात सर्वाधिक ओळख निर्माण केली आहे. इंडियन टू-व्हीलर मार्केटमध्ये तर हिरोचाच दबदबा आहे. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून सर्वाधिक मार्केट शेअरसह ही नंबर-१ टू-व्हिलर बनली कंपनी आहे. भारतीय बाजारपेठेत हिरोच्या बाईकची मागणी वाढली असून विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. भारतातील दिग्गज टू-व्हीलर कंपनी हीरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp) एक मोठा विक्रम स्वतःच्या नावे केला आहे. 

Hero MotoCorp च्या बाईकची धडाक्यात विक्री

२०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण ५६ लाख २१ हजार ४५५ दुचाकींची विक्री झाली आहे. यामध्ये देशांतर्गत विक्री आणि निर्यात या दोन्हींचा समावेश होतो. FY 24 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीच्या विक्रीत १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच, Hero MotoCorp च्या जागतिक व्यवसायात देखील संपूर्ण आर्थिक वर्षात १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

In politics of district Mamu factor implemented in Akot constituency once again come into discussion
‘मामु’ फॅक्टर चालणार?, दलितांसह इतरांचे एकगठ्ठा मतदान…
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
mita shetty
टाटा इंडिया इनोव्हेशन फंडाची कामगिरी कशी राहील?
rickshaw owners drivers Acche Din assembly election campaign
प्रचार मिरवणूकांमुळे रिक्षा चालकांना अच्छे दिन, तीन ते चार तासांसाठी रिक्षा चालकांना मिळतात ५०० ते १ हजार रुपये
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
world eyes on donald trump dealing with big tech during his second term of us president
बलाढ्य टेक कंपन्यांसाठी ट्रम्प यांच्या विजयाचा अर्थ काय ?
Tata Motors profit falls 11 percent as vehicle sales decline
वाहनांची विक्री घसरल्याने टाटा मोटर्सच्या नफ्यात ११ टक्के घट;  दुसऱ्या तिमाहीत ३,३४३ कोटी रुपयांवर
1115 crore IPO of Zinka Logistics from November 13 print
झिंका लॉजिस्टिक्सचा १,११५ कोटींचा ‘आयपीओ’ १३ नोव्हेंबरपासून

(हे ही वाचा : मारुतीचा नाद करायचा नाय! देशात आणतेय ‘ही’ नवी हायब्रिड कार, कधी होणार भारतात दाखल?)

मार्च २०२३ मध्ये कंपनीने ४९० हजार ४१५ मोटारसायकली आणि स्कूटर विकल्या आहेत. Hero MotoCorp च्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीतही वाढ झाली आहे. कंपनीने मार्च महिन्यात ४ हजारापेक्षा जास्त VIDA V1 इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री केली आहे, जी तिच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सची आतापर्यंतची सर्वाधिक मासिक विक्री आहे. आपला इलेक्ट्रिक ब्रँड Vida पुढे घेऊन, Hero MotoCorp ने देशातील १०० हून अधिक शहरांमध्ये त्याचा विस्तार केला आहे.

गेल्या आर्थिक वर्षात, Hero MotoCorp ने प्रीमियम मोटरसायकल सेगमेंटमध्ये अनेक बाईक लाँच केल्या, ज्यात Xtreme 125R, Xtreme 200S, Xtreme 160R 4V, Harley-Davidson X440, Karizma XMR आणि Mavrick 440 यांचा समावेश आहे. याशिवाय कंपनीने आपले नेटवर्कही मजबूत केले.