जुलै २०२३ हा महिना भारतीय टू व्हीलर सेगमेंटसाठी सकारात्मक ठरला आहे. काळ आपण देशातील चार चाकी सेगमेंटमधील कंपन्यांच्या विक्रीबद्दल जाणून घेतले. टू व्हीलर सेगमेंटमध्ये काही वाहन कंपन्यांना नुकसान झाले आहे. तर काही कंपन्यांच्या विक्रीमध्ये वार्षिक आधारावर चांगली वाढ झाली. आज आपण टॉप ५ ब्रँड पाहणार आहोत ज्यांनी सर्वाधिक टू व्हीलरची विक्री केली आहे.

Hero MotoCorp 

Hero MotoCorp ने जुलै २०२३ या महिन्यात देशांतर्गत बाजारात ३,७१,२०४ युनिट्सची विक्री केली. विक्रीमध्ये वार्षिक आधारावर १३.८ टक्के आणि MoM मध्ये १२.१ टक्के घसरण झाली. मागच्या वर्षी याच महिन्यात कंपनीने ४,३०,६८४ युनिट्सची विक्री केली होती.

e cycle ferry for Mahapex 2025 exhibition in Mumbai reached Nashik Roads Head Post Office on Thursday
इ सायकल फेरीत नाशिकमधील टपाल कर्मचाऱ्यांचा सहभाग
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
New Honda Dio 2025
New Honda Dio 2025 : ७५ हजारांमध्ये लाँच झाली नवीन होंडा डियो; जाणून घ्या, काय आहेत नवीन फीचर्स
Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
remarkable Performance of Auto Industry in 2024
अडीच कोटी वाहनांची वर्षभरात विक्री; ‘सियाम’ची आकडेवारी; २०२३ च्या तुलनेत १२ टक्क्यांची वाढ
Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
Atal Setu , Atal Setu one year , Atal Setu Transport ,
वर्षभरात अटल सेतूवरुन धावली ८२ लाख ८१ हजार वाहने, सेतू वाहतूक सेवेत दाखल होऊन एक वर्षे पूर्ण
Mercedes Benz crosses 2 lakh car sales print eco news
‘मर्सिडीज बेंझ’कडून दोन लाख मोटारींची विक्री; ‘मर्सिडीज बेंझ’कडून दोन लाख मोटारींच्या विक्रीचा टप्पा सर

हेही वाचा : टाटाची Punch iCNG देणार अन्य कंपन्यांना जोरदार टक्कर, ‘या’ पाच गोष्टी आहेत खास

Honda मोटारसायकल आणि स्कूटर India

होंडा मोटारसायकल आणि स्कूटर इंडियाच्या विक्रीमध्ये १२.५ टक्क्यांची घसरण झाली आहे. तसेच जुलै २०२३ मध्ये कंपनीने ३,१०,८६७ युनिट्सची विक्री केली. मागच्या वर्षी जुलै २०२२ मध्ये कंपनीने देशांतर्गत ३,५५,५६० युनिट्सची विक्री केली. तथापि MoM च्या आधारावर यात २.६ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. या विक्रीच्या आधारावर होंडा या यादीमध्ये दुसरी बेस्ट सेलिंग ब्रँड होण्यास यशस्वी झाली आहे.

TVS मोटर कंपनी

TVS मोटर कंपनीने या वर्षी जुलैमध्ये २,३५,२३० युनिट्सची विक्री केली. वार्षिक तुलनेत विक्रीमध्ये कंपनीने १६.४ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये त्याची देशांतर्गत विक्री २,०१,९४२ युनिट्सची विक्री केली. मासिक आधारावर विक्रीमध्येय किरकोळ घट नोंदवण्यात आली.

हेही वाचा : Car Sales In July 2023: ‘या’ पाच कंपन्यांचा भारतीय वाहन बाजारात दबदबा, टोयोटाकडून किआला धोबीपछाड

Bajaj ऑटो

बजाज ऑटोने जुलै २०२३ मध्ये १,४१,९९० युनिट्सची विक्री केली. देशामध्ये वार्षिक आधारावर १३. ६ टक्के आणि मासिक आधारावर १४.६ टक्क्यांची घसरण झाली. या घसरणीमुळे कंपनी जुलै महिन्यात चौथी बेस्ट सेलिंग कंपनी होण्यात यशस्वी झाली आहे.

सुझुकी Motorcycle India

सुझुकीने जुलै २०२३ मध्ये आतापर्यंतची सर्वाधिक मासिक विक्री केली आहे. कंपनीने जुलै २०२३ मध्ये ८०,३०९ युनिट्सची विक्री केली. ज्यात विक्रीमध्ये ३१.८ टक्क्यांची वार्षिक आणि २७.३ टक्क्यांची मासिक वाढ नोंदवली आहे. सुझुकी मोटारसायकल इंडिया ही बेस्ट सेलिंग यादीमध्ये पाचव्या स्थानावर आहे.

Story img Loader