हिरो मोटोकॉर्प ही जगातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी आहे. ती अनेक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली वाहने निर्यात करते. जानेवारी हा महिना कंपनीसाठी चांगला महिना ठरला आहे कारण कंपनीच्या दुचाकींची विक्री वार्षिक आधारावर २२ टक्क्यांनी वाढली आहे. Hero MotoCorp ची वाहन विक्री जानेवारी २०२४ मध्ये ४ लाख ३३ हजार ५९८ युनिट्सपर्यंत वाढली, तर गेल्या वर्षी (२०२३) जानेवारीमध्ये कंपनीची विक्री ३ लाख ५६ हजार ६९० युनिट्स होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जर आपण फक्त देशांतर्गत बाजारपेठेतील विक्रीबद्दल बोललो तर Hero MotoCorp ने सांगितले की, त्याच्या देशांतर्गत विक्रीत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे, ती आता ४ लाख २० हजार ९३४ युनिट्सवर पोहोचली आहे, तर गेल्या वर्षी (२०२३) जानेवारी महिन्यात ३ लाख ४९ हजार ४३७ युनिट्स होती.

(हे ही वाचा : कंगाल पाकिस्तानात बुलेट ‘इतकी’ स्वस्त का आहे? पण जेव्हा ‘ही’ खरी बाजू वाचाल तर डोक्याला हात लावाल!)

टीव्हीएस मोटार विक्रीतही वाढ

जानेवारी महिना केवळ Hero MotoCorp साठीच नाही तर TVS Motor साठी देखील चांगला गेला आहे, जानेवारीमध्ये या कंपनीच्या दुचाकींची विक्री २३ टक्क्यांनी वाढली आहे. TVS ने जानेवारी २०२४ मध्ये ३३९,५१३ युनिट्सची विक्री केली आहे तर गेल्या वर्षी (२०२३) जानेवारीमध्ये एकूण २ लाख ७५ हजार ११५ युनिट्सची विक्री झाली होती.

टीव्हीएस मोटरने निवेदनात म्हटले आहे की, दुचाकींच्या विक्रीत २५ टक्के वाढ नोंदवली गेली आहे. जानेवारी २०२३ मध्ये विक्री २ लाख ६४ हजार ७१० युनिट्स होती, जी जानेवारी २०२४ मध्ये वाढून ३२९,९३७ युनिट्स झाली. त्याच वेळी, देशांतर्गत बाजारपेठेत २४ टक्के वाढीसह २ लाख ६८ हजार २३३ मोटारींची विक्री झाली.

दुचाकी विभागातील मोटरसायकल विक्री गेल्या महिन्यात २९ टक्क्यांनी वाढून १ लाख ५५ हजार ६११ युनिट्सवर पोहोचली, जी जानेवारी २०२३ मध्ये १ लाख २१ हजार ०४२ युनिट्स होती. स्कूटर विभागातील विक्री जानेवारीमध्ये २४ टक्क्यांनी वाढून १ लाख ३२ हजार २९० युनिट्सवर गेली, जी मागील वर्षी याच महिन्यात १ लाख ०६ हजार ५३७ युनिट्स होती.

कंपनीने म्हटले आहे की, जानेवारीमध्ये त्यांची इलेक्ट्रिक वाहनांची विक्री १६,२७६ युनिट्स होती, जी वार्षिक आधारावर ३४ टक्क्यांनी वाढली आहे. कंपनीच्या एकूण निर्यातीत २२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hero motocorp tvs motor sales in january 2024 hero reported a significant sales milestone for january pdb