देशातील आघाडीची कंपनी हिरो मोटोकॉर्पने नवीन इलेक्ट्रिक तीनचाकी वाहनाचे अनावरण केले आहे. ‘सर्ज एस३२’ ( Surge S32) असे या इलेक्ट्रिक एसयूव्हीचे नाव आहे; जी केवळ तीन मिनिटांत दुचाकी स्कूटरमध्ये रूपांतरित होऊ शकते. म्हणजेच भारतातील प्रवाशांना टू इन वन असा पर्याय या खास इव्हीमधून मिळणार आहे.

RPG समूहाचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी सर्ज एस३२ दाखवत एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामुळे देशभरातील ग्राहकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. सर्ज एस३२ मध्ये प्रवासी केबिन, विंडस्क्रीन, हेडलाइट्स, टर्न इंडिकेटर आणि विंडस्क्रीन वायपर आदी आवश्यक फीचर्स आहेत. ही पारंपरिक तीनचाकी इलेक्ट्रिक कार्गो EV तंत्रज्ञानातील महत्त्वपूर्ण प्रगती दर्शवते आहे.

Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
lalpari
तुम्हीच सांगा, चूक कोणाची? दरवाजा एकीकडे अन् पायऱ्या दुसरीकडे, चालकाने दाखवली चूक; पाहा ‘लालपरी”चा Video Viral
New Car Launch Tata launches Tiago and Tigor in 2025
५ लाखांत टाटाने लाँच केली नवी कार! अपडेटेड Tiago आणि Tigor चे फीचर्स एकदा बघाच; थेट Marutiला देत आहे टक्कर
Drones will monitor illegal fishing and boat entry in Thane and Palghars bay
अनधिकृत मासेमारी आणि नौकांवर ड्रोनद्वारे नजर
Mahindra new EV project in Chakan print
महिंद्राचा चाकणमध्ये नवीन ईव्ही प्रकल्प
1975 International Womens Year completing 50 years
स्त्री चळवळीची पन्नाशी: भगिनीभाव जिंदाबाद!
hyundai creta electric features specifications and price in marathi
TATA ला टक्कर देणार Hyundai ची ‘Creata Electric’ कार! फक्त ५८ मिनिटांत चार्ज अन् 473 KM रेंज! जाणून घ्या फिचर्स अन् किंमत

एलईडी हेडलाइट्स, टर्न इंडिकेटर, स्पीडोमीटर आणि स्विच गियरसह सुसज्ज आदी फीचर्सने उपल्बध इलेक्ट्रिक स्कूटर शहरी प्रवाशांसाठी आरामदायी प्रवास प्रदान करते. सर्ज एस३२ ची पॉवर आणि बॅटरी तीनचाकी वाहन आणि स्कूटरमध्ये विभाजित करते आणि वाहनाची कामगिरी आणि कार्यक्षमता सुनिश्चित करते.

हेही वाचा…दिग्गज कंपन्या फक्त पाहत राहिल्या! टाटाने खेळला नवा गेम; देशात दाखल केली ट्विन सिलिंडर असलेली कार, बुकिंगही सुरु

व्हिडीओ नक्की बघा :

व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, बटण दाबताच वाहनाचे रूफ उघडते आणि त्यातून दुचाकी स्कूटर बाहेर येते. तसेच या इव्हीचे तीनचाकी आणि दुचाकी असे दोन्हीमध्ये रूपांतर होऊ शकते. म्हणजेच ही खास एसयूव्ही सर्ज एस३२ चे एक बटण दाबून थ्री-व्हीलरवरून टू-व्हीलर स्कूटरमध्ये बदलण्याची क्षमता ठेवते. म्हणजेच ग्राहक एकाच वाहनामध्ये दोन गाडीचा अनुभव घेऊ शकणार आहेत.

एसयूव्ही तीनचाकीसाठी ५० किलोमीटर आणि स्कूटरसाठी ६० किलोमीटर या सर्वोच्च गतीसह सर्ज एस३२ वस्तूंच्या वाहतुकीपासून प्रवासापर्यंत प्रवाशांसाठी उपयोगी ठरेल. याव्यतिरिक्त तीनचाकी ५०० किलो भार वाहून नेण्याची क्षमता आहे. गर्दीच्या शहरी भागात नेव्हिगेट करणाऱ्या व्यवसायांसाठी आणि डिलिव्हरी चालकांसाठी ही योग्य ठरेल. सर्ज एस३२ चे उद्दिष्ट शहरी प्रवाशांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी एक कार्यक्षम वाहतूक प्रदान करणे आहे.

Story img Loader