Hero MotoCorp launching new scooter : Hero MotoCorp ही जगातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी आहे. स्वस्त आणि चांगल्या दुचाकींसाठी हिरो कंपनीला मार्केटमध्ये खूप मागणी आहे. त्यामुळे कंपनीसुद्धा नवनवीन दुचाकी बाजारात आणत ग्राहकांचे लक्ष वेधून घेत असते. सध्या Hero MotoCorp लवकरच एक नवीन स्कूटर लाँच करणार आहे. ही स्कूटर बहुधा अपडेटेड Destini 125 असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काय असणार या स्कूटरची खासियत? कधी होणार लाँच? सविस्तर जाणून घेऊ या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिरो डेस्टिनी १२५ (Hero Destini 125) असे या नवीन स्कूटरचे नाव असणार आहे. गणेश चतुर्थीला म्हणजेच ७ सप्टेंबर २०२४ रोजी Hero MotoCorp हिरो डेस्टिनी १२५ स्कूटर लाँच करणार असे सांगण्यात आले आहे. नवीन Hero Destini स्कूटरचा अधिकृत टीझर रिलीज केला गेला आहे. त्यानुसार स्कूटरला समोरच्या ऍप्रनमध्ये नवीन लाईटिंग सेटअप आहे. फ्रंट फेंडर, हेडलाइट, काउल, रिअर-व्ह्यू मिररमध्येदेखील बदल करण्यात आले आहेत. नवीन डेस्टिनीसाठी नवीन ड्युअल-टोन, पर्ल ब्लॅक कलर पर्याय असेल. हेडलॅम्प क्लस्टरला नवीन H-आकाराचे LED DRL मिळते, जे सर्व अलीकडील Hero मॉडेल्समध्ये साम्य आहे.

हेही वाचा…Car Accessories : ड्रायव्हिंगसाठी ‘या’ १० ॲक्सेसरीज ठरतील बेस्ट; स्वस्तात होईल काम, प्रवासातील अडचणी होतील झटक्यात दूर

नवीन डिझाइनसह असणार हे जबरदस्त फीचर्स :

मागील लीक झालेल्या फोटोप्रमाणे Desitini 125 पूर्णपणे नवीन बॉडी पॅनेल्स, नवीन अलॉय व्हील्स, ऑल-ब्लॅक फ्रंट फोर्क्स, एक्झॉस्ट कव्हर प्लेट आणि ड्युअल-टोन साइड मिररसह असणार आहे. याव्यतिरिक्त, सीट डिझाइनमध्येही बदल करण्यात आले आहेत. तसेच मागे एलईडी टेल लॅम्पसुद्धा असणार आहे.

एकूणच ही स्कूटर पूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल असणार आहे; ज्याला कॉल, टेक्स्ट अलर्टसह ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी मिळते. Hero स्मार्टफोन ॲपद्वारे नवीन डेस्टिनीला टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन करण्यासही मदत करेल. तसेच नवीन Hero Destini सह i3S स्टार्ट/स्टॉप सिस्टमदेखील ऑफर करेल. टीझरमध्ये दाखवल्याप्रमाणे Desitini 125 मध्ये बायब्रे कॅलिपर्स, रियर डिस्क ब्रेक हे नवीन बदल असणार आहेत; अशी अपेक्षा वर्तवण्यात आली आहे. Destini 125 ला पॉवरिंग 124.6 cc इंजिन असेल, ज्याचे आउटपूट 9 bhp आणि 10.4 Nm टॉर्क असणार आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hero motocorp will be launching a new scooter very soon and it is most likely to be an updated version destini 125 asp