भारतात सर्वात जास्त दुचाकी विकणारी कंपनी Hero Motocorp भारतामध्ये लवकरच पहिली इलेक्ट्रिक स्कूटर सादर करणार आहे. Hero MotoCorp पुढील महिन्यात देशांतर्गत बाजारात आपले पहिले इलेक्ट्रिक वाहन सादर करण्याच्या तयारीत आहे. यासोबतच कंपनी इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारातही उतरणार आहे. या स्कूटरचे लाँचिंग ७ ऑक्टोबरला होणार आहे. Hero MotoCorp ची नवीन इलेक्ट्रिक दुचाकी TVS iQube, Bajaj Chetak, Ola S1 सारख्या स्कूटरशी स्पर्धा करेल.

मॉडेलच्या किमती येत्या काही आठवड्यांत उघड होतील. याची किंमत जवळपास एक लाख रुपये असू शकते असे मानले जात आहे. जयपूर, राजस्थान येथे कंपनीच्या कार्यक्रमासाठी डीलर्स, गुंतवणूकदार आणि जागतिक वितरकांना आमंत्रित करण्यात आले आहे. उद्योगातील कंपनी या कार्यक्रमात आपले पहिले ईव्ही उत्पादन सादर करणार आहे.

(हे ही वाचा : कार किंवा दुचाकी खरेदी करण्याचा विचार करताय; नुकसान टाळण्यासाठी ‘ह्या’ गोष्टी जाणून घ्या अन्यथा… )

Hero MotoCorp ने या वर्षी मार्चमध्ये सांगितले की त्यांनी १०,००० हून अधिक उद्योजकांना त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांसह पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन सोल्यूशनवर मदत करण्यासाठी $१०० दशलक्ष (सुमारे ७६० कोटी) जागतिक निधी तयार केला आहे. Hero MotoCorp आपल्या Vida ब्रँड अंतर्गत उदयोन्मुख वाहतूक उपाय सादर करण्याची योजना आखत आहे.

Story img Loader