Hero Electric NYX HX: पेट्रोलच्या वाढत्या किमतीने जनता त्रास झाली आहे. दुसरीकडे लोकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता वाढली आहे. यामुळे लोक आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळू लागले आहेत. बाजारात अनेक जुन्या आणि नवीन इलेक्ट्रिक वाहनांमध्ये स्पर्धा रंगली आहेत. जर तुम्ही दिवसातून १०० किमी पेक्षा जास्त प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी Hero Electric NYX HX इलेक्ट्रिक स्कूटर सर्वोत्तम असू शकते. कारण ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जमध्ये १६५ किमीपर्यंतची रेंज देते. चला जाणून घेऊया या इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल….
NYX HX इलेक्ट्रिक स्कूटरचे स्पेसिफिकेशन
या इलेक्ट्रिक स्कूटरचे वजन ८७ किलो इतकं आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर १६५ किमीची रेंज देते आणि Hero Electric NYX HX ची टॉप स्पीड ४२ किमी प्रतितास आहे. या स्कूटरचा ग्राउंड क्लीयरन्स १४१ mm आहे. त्याचबरोबर कंपनीकडून बॅटरी आणि मोटरची ३ वर्षांची वॉरंटी दिली जात आहे.
आणखी वाचा : तुम्ही ६४ हजार रूपयांमध्ये खरेदी करू शकता Nissan Magnite XE, जाणून घ्या काय आहेत फीचर्स आणि EMI
NYX HX इलेक्ट्रिक स्कूटरचे फीचर्स
हीरो इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ओडोमीटर, रिजनरेटिव्ह ब्रेक, स्टार्ट/स्टॉप बटण, यूएसबी चार्जिंग पोर्ट, फ्रंट स्टोरेज बॉक्स, डिजिटल स्पीडोमीटर, स्टेप्ड सीट, लो बॅटरी इंडिकेटर, एलईडी हेड लॅम्प आणि टर्न सिग्नल यांसारखी फीचर्स मिळतील.
NYX HX इलेक्ट्रिक स्कूटरसाठी ब्रेक, व्हील आणि सस्पेशन
हिरो इलेक्ट्रिकने या स्कूटरमध्ये CBS ब्रेकिंग सिस्टम दिली आहे. ड्रम ब्रेक पुढील आणि मागील बाजूस उपलब्ध असतील. यासोबतच स्कूटरला अलॉय व्हील मिळणार असून पुढच्या चाकाचा आकार १० इंच आहे. मागील चाकाचा आकार देखील १० इंच आहे. जर त्याच्या सस्पेन्शनबद्दल बोललो तर समोर टेलिस्कोपिक आणि मागील बाजूस ट्विन शॉक ऍब्जॉर्बर देण्यात आला आहे.
आणखी वाचा : एका चार्जमध्ये २०० KM रेंज देण्याचा दावा करते ही स्टायलिश इलेक्ट्रिक बाइक, जाणून घ्या किंमत
NYX HX इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत
हिरो इलेक्ट्रिकच्या या इलेक्ट्रिक स्कूटरची दिल्ली एक्स-शोरूम किंमत ७७,४४२ रुपये आहे. Bike.com वेबसाइटनुसार, तुम्ही ते २,६२६ च्या EMI वर घरी आणू शकता.