Top 5 Two Wheeler Sales: आर्थिक वर्ष २०२४ चा पहिला महिना (एप्रिल २०२३ – मार्च २०२४) दुचाकी विभागासाठी उत्तम ठरला आहे. टॉप १० यादीत समाविष्ट असलेल्या मोटारसायकल आणि स्कूटरच्या विक्रीत वार्षिक २३.७९ टक्के वाढ झाली आहे. एप्रिल २०२२ मध्ये ८,२८,६४३ युनिट्सच्या तुलनेत एप्रिल २०२३ मध्ये टॉप १० दुचाकींची विक्री १०,२५,७८२ युनिट्स होती. हिरो स्प्लेंडर ही सर्वाधिक विकली जाणारी बाईक असू शकते, परंतु बजाजच्या पल्सरनेही तिसरा क्रमांक पटकावला आहे.

पाहा टाॅप ५ दुचाकी विक्री

  • Hero Splendor आणि Honda Activa यांनी एप्रिल २०२३ मध्ये बजाज पल्सरसह दुचाकी विक्रीमध्ये पुन्हा एकदा या विभागात राज्य केले. एप्रिल २०२३ मध्ये, स्प्लेंडरची विक्री १३.३० टक्क्यांनी वाढून २,६५,२२५ युनिट्स झाली. स्प्लेंडरचा बाजारातील हिस्सा २५.८६ टक्के राहिला आहे.

(हे ही वाचा : देशातील सर्वात सुरक्षित कार मिळणार ६० हजारात, १ लिटर पेट्रोलमध्ये धावेल २७.३ किमी, पाहा कुठे मिळतेय शानदार डील )

fishermen demand government to approve diesel quota soon
हजारो मच्छीमारांना नव्या हंगामात डिझेल कोट्याची प्रतीक्षा; अनुदानास मंजुरी नसल्याने मच्छीमारांना आर्थिक भुर्दंड
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
traffic jam at Ghodbunder road , thane
कोंडीच्या चक्रव्यूहात घोडबंदरकर, सलग दुसऱ्या दिवशी वाहतुक कोंडी, वाहन चालकांकडून संताप व्यक्त, महिला प्रवासी रडकुंडीला
Gold Silver Price
Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! दरवाढीनंतर सोन्याचे भाव झालेत कमी, १० ग्रॅमची किंमत जाणून घ्या
Water every two days at Ovecamp in SmartCity Kharghar
स्मार्टसिटी खारघरमधील ओवेकॅम्पात दोन दिवसाआड पाणी
Doctors of Paral Wadia Hospital succeeded in removing a tangle of hair from a 10 year old girl stomach Mumbai
मुलीच्या पोटातून काढला केसांचा गुंता; वाडिया रुग्णालयात यशस्वी उपचार
Bomb threat, medicover hospital,
खारघरच्या मेडीकव्हर रुग्णालयाला ‘बॉम्ब’ धमकीचा मेल
What is the reason for the obstructions in the Pimpri to Nigdi Metro route Pune
पिंपरी ते निगडी मेट्रोमार्गात अडथळा, काय आहे कारण?
  • Honda Activa एप्रिल २०२३ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. Activa ने ५०.६० टक्के वाढीसह २,४६,३५७ युनिट्सची विक्री केली आहे. या यादीत Activa चा सध्या २३.९८ टक्के हिस्सा आहे. कंपनी आता पुढील वर्षी Activa इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याचा विचार करत आहे. Activa Electric ची स्पर्धा TVS iQube आणि बजाज चेतकशी असेल.
  • बजाज पल्सर तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याची विक्री एप्रिल २०२३ मध्ये १५०.५९ टक्क्यांनी वाढून १,१५,३७१ युनिट्सवर गेली आहे. NS160, NS200 आणि 220 ने पल्सर विक्रीत प्रभावी योगदान दिले आहे.
  • यानंतर चौथ्या क्रमांकावर होंडा सीबी शाईन आणि पाचव्या क्रमांकावर हिरो एचएफ डिलक्स बाईक आहे. एप्रिलमध्ये होंडा सीबी शाइनच्या विक्रीत घट झाली असून, ८९,२६१ युनिट्सची विक्री झाली. त्याचप्रमाणे एचएफ डिलक्सच्या विक्रीत २१.७७ टक्के घट झाली आहे.