Best Selling Bike: भारतीय बाजारपेठेत बाईक खरेदी करणाऱ्यांसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अनेक नवीन बाईक्स देखील सातत्याने लाँच केल्या जात आहेत, तरीही अशा काही बाइक्स आहेत ज्या वर्षानुवर्षे ग्राहकांच्या हृदयावर राज्य करत आहेत आणि नेहमी पहिल्या पाचच्या यादीत राहतात. जर आपण आर्थिक वर्ष २०२३ बद्दल बोललो, तर हिरोच्या स्वस्त बाईकने इतर सर्व मॉडेल्सला मागे टाकले आहे. एका वर्षातच या बाईकचे ३२ लाखांहून अधिक युनिट्स विकले गेले आहेत.
देशातील सर्वाधिक विकली जाणारी बाईक
आर्थिक वर्ष २०२३ मध्ये, Hero Splendor ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी बाईक ठरली आहे. या बाईकचे ३२,५५,७४४ युनिट्स विकले गेले. अगदी १ वर्षापूर्वी या बाईकचे फक्त २६.६५ लाख युनिट्स विकले गेले होते. अशा प्रकारे हिरो स्प्लेंडरने २२ टक्क्यांहून अधिक वार्षिक वाढ नोंदवली आहे. हिरो स्प्लेंडरचे अनेक मॉडेल्स बाजारात विकले जात आहेत, ज्यामध्ये स्प्लेंडर प्लस आणि सुपर स्प्लेंडर सर्वाधिक लोकप्रिय आहेत. Splendor Plus ची सुरुवातीची किंमत सुमारे ७२ हजार रुपये आहे.
(हे ही वाचा : Maruti च्या ‘या’ सर्वात स्वस्त ५ सीटर कारसमोर सर्वांनीच मानली हार! Hyundai-Tata ला मागे टाकत आघाडीवर, मायलेज ३० किमी )
टॉप 5 बाईक्सची यादी
या यादीत होंडा सीबी शाईन दुसऱ्या स्थानावर आहे. ज्याचे १२.०९ लाख युनिट्स वर्षभरात विकले गेले आहेत. या बाईकने वार्षिक ९ टक्के वाढ नोंदवली आहे. हिरोची एचएफ डिलक्स देखील १०.५२ लाख युनिट्स विकल्या गेलेल्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. या बाईकच्या विक्रीत ९ टक्क्यांची घट झाली आहे.
त्याचप्रमाणे बजाज पल्सर चौथ्या क्रमांकावर तर बजाज प्लॅटिना पाचव्या स्थानावर आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये, बजाज पल्सरच्या १०.२९ लाख युनिट्सची विक्री झाली आहे आणि या बाईकने ३२ टक्क्यांहून अधिक वार्षिक वाढ नोंदवली आहे. त्याचप्रमाणे, बजाज प्लॅटिनाच्या ५.३४ लाख युनिट्सची विक्री झाली आणि या बाईकच्या विक्रीत ७ टक्क्यांची घट झाली आहे.