टू व्हीलर सेक्टरमध्ये कमी बजेटमध्ये जास्त मायलेजचा दावा करणाऱ्या अनेक बाइक आहेत, ज्यामध्ये Hero, Bajaj, TVS आणि Honda सारख्या कंपन्यांच्या बाइक मोठ्या संख्येने आहेत. तुम्‍ही स्‍वत:साठीही अशीच मायलेज देणारी बाईक शोधत असाल, जी दिसायलाही आकर्षक असेल, तर येथे तुम्हाला देशातील दोन लोकप्रिय बाईकची संपूर्ण माहिती जाणून घेता येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आजच्या या तुलनेत, आपण Hero Splendor i Smart आणि TVS Radeon या दोन बाईकची तुलना करणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला या दोन्ही बाईकच्या किंमतीपासून ते फीचर्स आणि मायलेजपर्यंत संपूर्ण माहिती मिळेल.

हीरो स्प्लेंडर आई स्मार्ट (Hero Splendor iSmart)

ही आकर्षक डिझाइन केलेली बाईक आहे जी कंपनीने दोन व्हेरियंटसह बाजारात आणली आहे. या बाईकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर यात 113.2 सीसी सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे जे फ्यूल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे.

(हे ही वाचा: देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार! एकाच चार्जमध्ये करू शकाल दिल्ली ते हरिद्वारचा प्रवास; जाणून घ्या अधिक तपशील)

हे इंजिन 9.15 पीएस ची पॉवर आणि 9.89 एनएम चा पीक टॉर्क जनरेट करते, ज्यात ४ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. बाईकच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या पुढच्या चाकाला डिस्क ब्रेक आणि मागील चाकाला ड्रम ब्रेक आहे.

मायलेजबाबत, कंपनीचा दावा आहे की ही बाईक ६१ किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते आणि हे मायलेज ARAI द्वारे प्रमाणित आहे. हीरो स्प्लेंडर आई स्मार्टची सुरुवातीची किंमत ६९,६५० रुपये आहे, जी त्याच्या टॉप व्हेरियंटमध्ये जाते, ती ७२,३५० रुपये होते.

(हे ही वाचा: Yamaha YZF R15 V3 VS KTM RC 125: मायलेज, स्टाइल आणि किमतीमध्ये कोणती स्पोर्ट्स बाईक आहे चांगली? जाणून घ्या)

टीवीएस रेडियन (TVS Radeon)

टीवीएस रेडियन कंपनीने नुकतेच लॉंच केले आहे, ज्याचे तीन व्हेरियंट कंपनीने बाजारात लॉंच केले आहेत. या बाईकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, यात १०९.७ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे जे फ्यूल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे.

हे इंजिन ८.१९ पीएस ची पॉवर आणि ८.७ एनएम चा पीक टॉर्क जनरेट करते, जे ४ स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ब्रेकिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर, या बाईकच्या पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक आहे.

(हे ही वाचा: Petrol- Diesel Price Today: विकेंडला गाडीची टाकी फुल करायची आहे? जाणून घ्या प्रति लिटर पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव)

मायलेजबद्दल, TVS दावा करते की ही बाईक ७३.६८ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI द्वारे प्रमाणित आहे. टीवीएस रेडियनची सुरुवातीची किंमत ५९,९०० रुपये आहे जी टॉप व्हेरियंटवर जाताना ७१,०८२ रुपयांपर्यंत जाते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hero splendor ismart vs tvs radeon which is the best option in style mileage and price find out ttg