भारतात चारचाकी वाहनांपेक्षा सर्वाधिक खप हा दुचाकींचा होतो. दुचाकी क्षेत्रात कमी बजेटमध्ये येणाऱ्या बाइक्सची संख्या खूप जास्त आहे. सर्वाधिक मायलेजचा दावा कंपन्यांकडून करण्यात येतो. यात हिरो, बजाज, टीव्हीएस आणि सुझुकी सारख्या कंपन्यांच्या समावेश आहे. तुम्हीही मायलेज असलेली स्टायलिश बाइक विकत घेण्याच्या विचारात असाल तर दोन लोकप्रिय बाइक्सची संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या. यसाठी हिरो स्प्लेंडर प्लस आणि टीव्हीएस रेडियन या दोन दुचाकी आहेत. गाड्यांची किंमत, वैशिष्ट्ये, मायलेज आणि स्पेसिफिकेशनची संपूर्ण माहिती जाणून घ्या

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Hero Splendor Plus: हिरो स्प्लेंडर प्लस ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी बाईक आहे. ही गाडी कंपनीने पाच प्रकारांसह बाजारात आणली आहे. या बाईकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर, यात ९७.२ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन ८.०२ पीएस पॉवर आणि ८.०५ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. तसेच ४-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. बाईकच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की, हिरो स्प्लेंडर प्लस ८०.६ किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते. मायलेज ARAI ने प्रमाणित केला आहे. हिरो स्प्लेंडर प्लसची सुरुवातीची किंमत ६४,८५० रुपये असून ७०,७१० टॉप मॉडेलपर्यंत पोहोचते.

इलेक्ट्रिक कारचा आवाज येण्यासाठी विशेष मशिन लावण्याचा विचार; कारण…

TVS Radeon: टीव्हीएस रेडियन ही त्यांच्या कंपनीची सर्वाधिक मायलेज असलेली बाईक आहे. कंपनीने नुकतंच या बाइकचं लॉन्चिंग केली आहे. टीव्हीएसने ही बाईक तीन प्रकारांसह बाजारात आणली आहे. बाईकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर टीव्हीएसने त्यात १०९.७ सीसीचे सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. इंजिन एअर कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन८.१९ पीएसची पॉवर आणि ८.७ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. तसेच ४-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. बाईकच्या ब्रेकिंग सिस्टमबद्दल सांगायचे तर, कंपनीने तिच्या पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागच्या चाकात ड्रम ब्रेक दिला आहे. मायलेजच्या बाबतीत, टीव्हीएस रेडियन ७३.६८ किमीचा मायलेज देते, असा दावा कंपनीने केला आहे. हा मायलेज ARAI द्वारे प्रमाणित आहे, टीव्हीएस रेडियनची सुरुवातीची किंमत रु. ५९,९०० रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलवर ७१,०८२ रुपयांपर्यंत जाते.