भारतात ओला आणि बजाज चेतक सारख्या इलेक्ट्रिक स्कुटर आधीच धुमाकूळ घालत आहेत. आता यांना दुचाकी निर्मिती क्षेत्रातील नामंकित कंपनी हिरो मोटोकॉर्प आपल्या नव्या स्कुटरने आव्हान देणार आहे. हिरो ७ ऑक्टोबरला भारतीय बाजारात आपला नवा स्कुटर लाँच करणार आहे. स्कुटर कसा असेल, किती मायलेज देईल, याबाबत हिरोच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुक्ता होती. आता ही उत्सुक्ता अधिक वाढणार आहे. कंपनीने लाँचिंगपूर्वीच टिजर व्हिडिओ रिलीज केला आहे. युट्यूबवर VIDA World ने हा व्हिडिओ शेअर केला आहे. तो पाहून डिझाईनच्या बाबतीत स्कुटर स्टाईलिश असल्याचे दिसून येते.

व्हिडिओमध्ये Hero Vida ची सिलीहौटी दाखवण्यात आली आहे. यातून तिच्या डिझाईनचा अंदाज येईल. मात्र ही सिलिहौटी हेच मूळ डिझाईन असेल याची गॅरंटी नाही. केवळ स्कुटर लाँचची बातमी देण्यापूर्ती देखील ही सिलिहौटी असू शकते. व्हिडाची किंमत १ लाखांच्या जवळपास असण्याचा आंदाज आहे. ही स्कुटर ओला एसवन प्रो, अथर ४५० एक्स, टीव्हीएस आय क्यूब आणि बजाज चेतक या वाहनांना आव्हान देणार आहे.

(आलिशान कार बनवणारी ‘ही’ कंपनी भारतात विकतेय सेकंड हँड कार, हे आहे कारण)

हे असणार फीचर

हिरो व्हिडामध्ये मिडशीप माउंटेड मोटर असण्याची शक्यता आहे. ही मोटर उच्च कार्यक्षमतेसाठी ओळखल्या जाते. बेल्ट ड्राईव्ह प्रणालीच्या माध्यमातून ही मोटर मागील चक्का फिरवते. सस्पेन्शनच्या बाबतीत वाहनामध्ये १२ इंच व्हिल्ससह पुढे टेलिस्कोपिक फोर्क आणि मागे १० इंच व्हिल्ससह स्विंग आर्म युनिट असण्याची शक्यत आहे. या स्कुटरमध्ये स्वॅपेबल बॅटरी मिळू शकतात. म्हणजे चार्जिंग संपलेली बॅटरी तुम्ही स्कुटरमधून काढून ती बदलू शकता. यामुळे तुम्हाला चार्जिंगसाठी वाट पाहण्याची गरज पडणार नाही.

काही कारणामुळे या स्कुटरचे लाँच पुढे ढकलण्यात आले होते. स्कुटर जुलै महिन्यात लाँच होणार होती, मात्र सेमी कंडक्टरची टंचाई आणि पुरवठा साखळीतील समस्यांमुळे हे होऊ शकले नाही, असे हिरो मोटोकॉर्पचे चेअरमेन पवन मुंजल यांनी सांगितले होते. दरम्यान ही स्कुटर आंध्रप्रदेशातील चिंतूर येथे तयार केली जाण्याची शक्यता आहे.

Story img Loader