Upcoming Hero MotoCorp Bike: आपल्याकडे कम्यूटर बाइकच्या (प्रवासी बाइक) सेगमेंटमध्ये १००, ११० सीसी ते १२५ सीसी क्षमतेच्या बाइक्सना सर्वाधिक मागणी आहे. जितकं मोठं आणि पॉवरफुल इंजिन तितकी जास्त किंमत. या सेगमेंटमध्ये १२५ सीसी बाइक्स सर्वाधिक विकल्या जातात. १२५cc बाईक १००cc पेक्षा जास्त पॉवर मिळवते आणि ती देखील मायलेज कमी न करता. याशिवाय, १२५ सीसी बाईक थोड्या अधिक स्टायलिश डिझाइनमध्ये देखील उपलब्ध आहेत.
सध्या, Honda SP125 आणि Hero Glamour व्यतिरिक्त, TVS Raider 125 ची देखील १२५cc कम्युटर सेगमेंटमध्ये चांगली विक्री होत आहे. Raider ही बाईक आपल्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक वैशिष्ट्ये आणि प्रीमियम डिझाइनसह येते. या बाईकमध्ये असे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. हे लक्षात घेऊन आता Hero MotoCorp TVS Raider शी टक्कर देण्यासाठी नवीन बाईक लाँच करण्याच्या तयारीत आहे.
(हे ही वाचा : देशातल्या सर्वात सुरक्षित टॉप ५ कार्समध्ये Tata ची एकही कार नाही, कारण काय…?)
चाचणी दरम्यान दिसली बाईक
Hero MotoCorp आपल्या नवीन बाईकची चाचणी करत असल्याची माहिती आहे. नुकतेच त्याचे काही फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. बातमीनुसार, कंपनीची ही बाईक थेट TVS Raider 125 शी टक्कर देण्यासाठी आणली जाईल. TVS चे डिझाईन लक्षात घेऊन हिरोने आपल्या नवीन बाईकला अतिशय स्पोर्टी आणि स्टायलिश लुक देखील दिला आहे. याला असे डिझाईन दिले गेले आहे की ते 125 पेक्षा अधिक शक्तिशाली दिसते.
मिळालेल्या माहितीनुसार, या बाईकला रेडरप्रमाणेच मागील बाजूस मोनोशॉक सस्पेंशन देण्यात आले आहे. याशिवाय बाईकला मागील बाजूस रुंद टायर देण्यात आला आहे. पुढच्या बाजूला असलेल्या स्लिम हेडलॅम्पमुळे ते खूप स्पोर्टी दिसते. बाईकमध्ये एलईडी टर्न इंडिकेटर आणि एलईडी टेललॅम्प देण्यात आले आहेत. याशिवाय बाईकमध्ये मागील टायर हगर, अॅल्युमिनियम फूटरेस्ट आणि अतिशय शार्प टेल सेक्शन देण्यात आला आहे. यात स्पोर्ट्स बाईक सारखी धारदार इंधन टाकी मिळते. कंपनी याला ड्युअल डिस्क ब्रेकसह देऊ शकते.
मिळालेल्या माहितीनुसार हिरो ही बाईक पुढच्या वर्षी लॉन्च करू शकते. त्याच वेळी, रेडरला टक्कर देण्यासाठी कंपनी रेडरपेक्षा कमी किमतीत लॉन्च करू शकते. TVS Raider 125 ची किंमत 87,000 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.