दुचाकी क्षेत्रातील एंट्री लेव्हल स्पोर्ट्स बाईक्सना प्रचंड मागणी आहे, त्यामुळे या बाईक्स स्टायलिश डिझाईन आणि चांगली मायलेज असलेल्या कमी किमतीत उपलब्ध आहेत. या सेगमेंटमध्ये बजाज, हिरो, होंडा, सुझुकी आणि टीव्हीएस सारख्या कंपन्यांच्या बाईक्स मोठ्या प्रमाणात आहेत.

जर तुम्ही एंट्री लेव्हल स्पोर्ट्स बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल परंतु अद्याप कोणतीही बाईक खरेदी करू शकला नसेल, तर या विभागातील दोन लोकप्रिय बाईक्सची संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या.

Mike Tyson, YouTube Influencer, Netflix, Mike Tyson news, Mike Tyson latest news,
विश्लेषण : माजी जगज्जेता माइक टायसन यू-ट्यूब इन्फ्लुएन्सरकरडून पराभूत! लढत खरी होती की लुटुपुटूची? फायदा नेटफ्लिक्सचाच?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग
Bike caught a fire alive man burnt in fire viral video on social media
VIDEO: एक चूक जीवावर बेतली! गाडीला आग लागताच लोक विझवायला गेले; पण पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून उडेल थरकाप
tom cruise mission impossible 8 teaser released
Video : खोल समुद्रातील मिशन अन् जबरदस्त अ‍ॅक्शन; टॉम क्रूझच्या ‘Mission Impossible 8’ चा टीझर प्रदर्शित; सिनेमाची रिलीज डेटही ठरली
2024 Maruti Suzuki Dzire Launch Live Updates: Prices start at Rs 6.79 lakh, to rival Honda Amaze
५ स्टार सेफ्टी रेटिंग, जबरदस्त मायलेज आणि आकर्षक लूकसह नवीन मारुती जनरेशन Dzire 2024 लाँच; पाहा किंमत
table no 21 joker blind psycholigical thrillers on ott
‘मर्डर २’ पाहिलाय? त्याहूनही भयानक आहेत जिओ सिनेमावरील ‘हे’ सायकॉलिजल थ्रिलर चित्रपट; पाहा यादी

आज स्पोर्ट्स बाईक कम्पेअरमध्ये, आमच्याकडे Hero Xtreme 160R आणि TVS Apache RTR 160 आहेत ज्यात तुम्हाला त्यांच्या इंजिनची संपूर्ण माहिती आणि त्या दोन्हीच्या किमतीवरून मायलेज कळेल.

आणखी वाचा : मोठ्या कुटुंबासाठी केवळ ६४ हजारात मिळतेय रेनॉल्ट ट्रायबर, जाणून घ्या ऑफर

Hero Xtreme 160R
Hero Xtreme 160R ही त्याच्या कंपनीच्या सर्वोत्कृष्ट लोकप्रिय बाईक्सपैकी एक आहे, ज्याची नवीन वर्जन कंपनीने नुकतीच लॉंच केली आहे. हलके वजन, स्टायलिश डिझाईन आणि मायलेज यामुळे या बाईकला पसंती दिली जाते.

या बाईकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने यात सिंगल सिलेंडर १६३ सीसी इंजिन दिले आहे. हे इंजिन १५.२ PS पॉवर आणि १४ Nm पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीने या इंजिनसोबत ५ स्पीड गिअरबॉक्स जोडला आहे.

मायलेजबाबत, कंपनीचा दावा आहे की हा Hero Xtreme 160R 55.47 kmpl चा मायलेज देतो आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

बाईकच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने याला सिंगल डिस्क आणि डबल डिस्क अशा दोन्ही व्हेरिएंटसह बाजारात लॉंच केले आहे. ज्यामध्ये अलॉय व्हील्स आणि ट्यूबलेस टायर जोडण्यात आले आहेत.

Hero Xtreme 160 कंपनीने बाजारात १.१७ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) च्या सुरुवातीच्या किंमतीसह लॉंच केला आहे, जो टॉप व्हेरिएंटमध्ये जाताना १.२२ लाख रुपयांपर्यंत जातो.

आणखी वाचा : २ तासात विकला गेला ‘या’ इलेक्ट्रिक SUV चा स्टॉक, २०२३ साठी प्री बुकिंग सुरु, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

TVS Apache RTR 160
TVS Apache ही त्याच्या कंपनीची त्याच्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारी बाईक आहे जी तिच्या स्टाईल आणि वेगासाठी पसंत केली जाते. कंपनीने आतापर्यंत या बाईकचे पाच व्हेरिएंट बाजारात आणले आहेत.

बाइकमध्ये १६४.९ सीसीचे सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन १९.२ PS पॉवर आणि १४.२ Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ५ स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे.

ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने ही बाईक सिंगल डिस्क आणि डबल डिस्क अशा दोन्ही व्हेरिएंटसह बाजारात आणली आहे. यासोबतच अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर जोडण्यात आले आहेत.

मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की, ही TVS Apache RTR 160 स्पोर्ट्स बाईक ५५.४७ kmpl चा मायलेज देते. हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.
TVS Apache RTR 160 ची सुरुवातीची किंमत १.२२ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे जी टॉप व्हेरिएंवर १.४५ लाखांपर्यंत जाते.