Holi 2023 Car Discount Offer: होळीच्या निमित्ताने, जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल परंतु चांगल्या सवलतीच्या ऑफरची वाट पाहत असाल, तर तुमची प्रतीक्षा संपली आहे रेनॉल्ट इंडिया, आपल्या दोन कारवर आकर्षक सूट देत आहे. कंपनी ज्या गाड्यांवर ही सूट देत आहे त्यात Renault Kwid आणि Renault Kiger या कारचा समावेश आहे.

Renault Kwid Holi 2023 Discount

Renault Kwid ही आकर्षक डिझाइन केलेली एंट्री-लेव्हल हॅचबॅक कार आहे जी तिच्या स्वस्त डिझाइन, मायलेज आणि वैशिष्ट्यांसाठी आवडते. रेनॉल्टच्या बाजूने, कंपनी या कारच्या २०२२ मॉडेलच्या खरेदीवर ५७,००० रुपयांपर्यंत सूट देत आहे. Renault Kwid वर या सवलतीमध्ये २५,००० रुपयांची रोख सवलत, २०,००० रुपयांचे एक्सचेंज बोनस आणि १२,००० रुपयांचे कॉर्पोरेट सूट देखील जोडण्यात आली आहे.

tujhyat jeev rangala fame actor amol naik bought a new car
रुपाली भोसलेनंतर ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्याने दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदी केली आलिशान गाडी, पाहा फोटो
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Oben Electric confirms Rorr EZ Launch Date
Oben Electric Rorr EZ : आता बदलतं तापमान सहन करणार तुमची इलेक्ट्रिक बाईक; ‘या’ दिवशी होणार लाँच, पाहा कसे असतील फीचर्स
traffic e-challan
ई-चलन घोटाळ्यापासून सावध रहा! ट्रॅफिक चलनच्या नावाखाली होतेय फसवणूक, कसे टाळावे?
firecrackers of worth rs 30000 stolen after beating up seller in baner
बाणेरमध्ये फटाका विक्रेत्याला मारहाण करुन  लूट; ऐन दिवाळीत लूटमार; ३० हजारांचे फटाके चोरुन चोरटे पसार
Should buy gold or diamond jewellery on Diwali
Money Mantra : दिवाळीत सोन्याचे की हिऱ्याचे दागिने घ्यावेत?
How many options are there to buy gold or jewellery for Diwali
Money Mantra : दिवाळीसाठी सोने वा दागिने घेण्याचे किती पर्याय आहेत?
Car sales around Diwali has fallen so low this year
Car Sales In Festive Season Low : सणासुदीच्या हंगामात ग्राहकांनी गाड्यांकडे फिरवली पाठ; विक्री झाली १८ टक्क्यांनी कमी, नेमकं कारण काय?

रेनॉल्ट इंडिया आपल्या ग्रामीण विस्तार कार्यक्रमांतर्गत शेतकरी, गावचे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना ५,००० रुपयांची अतिरिक्त सवलत देखील देत आहे. याशिवाय, कंपनी आपल्या स्क्रॅपेज प्रोग्राम अंतर्गत १०,००० रुपयांपर्यंतचा अतिरिक्त बोनस देखील देत आहे, ज्यासाठी कंपनीच्या अटी पूर्ण करणारे ग्राहक यासाठी अर्ज करू शकतात.

(हे ही वाचा : Toyota Fortuner चे धाबे दणाणले, ‘मेड इन इंडिया’ सर्वात स्वस्त SUV ची वाढली मागणी, किंमत १२.७४ लाख )

Renault Kiger Holi 2023 Discount

Renault KIGER ही देशातील सब ४ मीटर SUV श्रेणीतील सर्वात कमी किमतीची SUV आहे जी किमतीव्यतिरिक्त आकर्षक डिझाईनमुळे पसंत केली जाते. होळी २०२३ दरम्यान, कंपनी या एसयूव्हीच्या खरेदीवर ६२,००० रुपयांपर्यंत सूट देत आहे. ही सवलत या SUV च्या २०२२ आणि २०२३ (३१ मार्चपूर्वी BS6 फेज 1) मॉडेल्सवर उपलब्ध असेल.

जर ग्राहकांनी Renault Kaigar चे BS6 सेकंड फेज मॉडेल खरेदी केले तर कंपनी ५४ हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. याशिवाय, या एसयूव्हीवर ग्रामीण भारत आणि स्क्रॅपेज पॉलिसीसह योजना देखील उपलब्ध असेल.

महत्त्वाची सुचना: या रेनॉल्ट इंडिया कारवरील सवलत ऑफर राज्यानुसार आणि शहरानुसार बदलू शकते. त्यामुळे, सूट अंतर्गत कोणतीही कार खरेदी करण्यापूर्वी, या सवलतीच्या ऑफरची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा तुमच्या जवळच्या Renault डीलरशिपला भेट द्या.