भारतीय बाजारात स्कूटरला मोठी मागणी आहे. बाईकसह स्कूटरची मागणी पाहता विविध कंपन्यांच्या स्कूटर बाजारात विक्रीसाठी आहेत. त्यामुळे नेमकी कोणती स्कूटर घ्यायची असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर आज आम्ही दोन स्कूटरची माहिती देणार आहोत. या तुलनेसाठी, आमच्याकडे Honda Activa 125 आणि TVS Jupiter 125 आहेत, ज्यामध्ये तुम्हाला त्या दोघांची किंमत ते फीचर्स आणि स्पेसिफिकेशन ते मायलेजपर्यंत संपूर्ण माहिती मिळेल.
Honda Activa 125: होंडा अॅक्टिव्हा ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे. कंपनीने पाच प्रकारांसह बाजारात लॉन्च केली आहे. या स्कूटरच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये १२४ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे जे फ्यूल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन ८.२९ पीएस पॉवर आणि १०.३ एनएम पीक टॉर्क जनरेट केलं असून ऑटोमॅटिक ट्रान्समिशनला जोडलं जातं. स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टमबद्दल सांगायचे तर, कंपनीने पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन दिले आहे. या स्कूटरच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की, होंडा अॅक्टिव्हा 125 ६० किलोमीटरचा मायलेज देत असून ARAI द्वारे प्रमाणित आहे. होंडा अॅक्टिव्हा 125 ची सुरुवातीची किंमत ७४,१५७ रुपये असून टॉप व्हेरियंटवर जाताना ८२,२८० रुपयांपर्यंत जाते.
TVS Jupiter 125 Vs Yamaha Fascino 125 : या दोन स्कूटर्सचे फिचर आणि किंमत जाणून घ्या
TVS Jupiter 125: टीव्हीएस ज्यूपिटर 125 ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे. कंपनीने अलीकडेच एका नवीन अवतारात ही स्कूटर सादर केली आहे. आतापर्यंत पाच प्रकार बाजारात लाँच करण्यात आले आहेत. स्कूटरच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, यात सिंगल सिलेंडर १२४ सीसी इंजिन आहे जे फ्यूल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन ८.२९ पीएस पॉवर आणि १०.३ एनएम पीक टॉर्क जनरेट करते, ज्याचे ट्रान्समिशन ऑटोमॅटिक आहे. ज्युपिटरच्या ब्रेकिंग सिस्टममध्ये, कंपनीने त्याच्या पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन दिले आहे. मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की, स्कूटर ६४ किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते आणि ARAI द्वारे प्रमाणित आहे. टीव्हीएस ज्युपिटरची सुरुवातीची किंमत ७३,४०० रुपये आहे आणि टॉप व्हेरिएंटवर ८१,३०० रुपयांपर्यंत जाते.