Honda Activa Electric: सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने ग्राहकांचा कौल इव्ही वाहनांकडे झुकला आहे. चारचाकी इव्ही वाहनांनाही ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. तर, दुचाकी खरेदी करणाऱ्यांनाही इलेक्ट्रिक स्कुटरला पंसती देऊ केली आहे. यामुळे मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना खासकरून स्कूटर आणि बाईक्सची मागणी जोर धरू लागली आहे. अनेक दुचाकी उत्पादक कंपनीज सुद्धा आपल्याला ई व्हेइकल्स मार्केटमध्ये आणण्यास तयार आहेत. जर तुम्ही भविष्यात नवीन इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.जेव्हा आपण स्कूटरविषयी बोलतो, तेव्हा आपसूकच आपल्या डोळ्यासमोर होंडा कंपनीची अॅक्टिव्हा स्कूटर उभी राहते. होंडाच्या अॅक्टिव्हाला ग्राहकांनी प्रचंड प्रतिसाद दिला त्यामुळे कंपनीने या स्कूटरचे 2G 3G 4G असे अपडेटेड व्हर्जन लाँच केले आहे. आता कंपनी याचा अॅक्टिव्हाचे इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच करण्याच्या तयारीत आहेत.
होंडा मोटरसायकल या महिन्यात आपली इलेक्ट्रिक एक्टिव्हा लाँच करणार आहे. ही स्कूटर लाँच होण्यापूर्वी एक टीझर पोस्ट करण्यात आला आहे ज्यामध्ये स्कूटरच्या रेंज डिटेल्सची माहिती मिळते.
होंडा एक्टिव्हा इलेक्ट्रिकने नुकत्याच प्रदर्शित केलेल्या टिझरमध्ये तुम्ही पाहू शकता की, यात डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर असेल जे फीचर आणि कनेक्टिव्हिटीला हायलाईट करते. याव्यतिरिक्त टिझरमध्ये हे ही दिसून आले आहे की, अपकमींग होंडा एक्टिव्हा इलेक्ट्रिक अनेक डिस्प्ले ऑप्शनसह येईल. विशेष म्हणजे यात २ वेगवेगळे डिजिटल डिसप्ले देखील पाहायला मिळाले आहे.
होंडा ही दुचाकी बाजारपेठेतील एक मोठी खेळाडू आहे, परंतु ती भारताच्या इलेक्ट्रिक स्कूटर विभागात थोडा उशिराने प्रवेश करत आहे. तर नवीन मॉडेलमध्ये विश्वासार्ह ॲक्टिव्हा नाव वापरल्यास, चांगली वैशिष्ट्ये, स्टायलिश डिझाइन आणि स्पर्धात्मक किंमत दिल्यास, ॲक्टिव्हा ब्रँडच्या मजबूत प्रतिष्ठेमुळे बाजारपेठेतील इतर स्पर्धाकांना धक्का देऊ शकते.
हेही वाचा >> Royal Enfield ची पहिलीवहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच; जबरदस्त लूक, फिचर्स अन् किंमत लगेच जाणून घ्या
इलेक्ट्रिक एक्टिव्हाची किंमत
मिळालेल्या माहितीनुसार, होंडाने इलेक्ट्रिक एक्टिव्हाच्या प्रोडक्शनसाठी गुजरात आणि कर्नाटकमध्ये वेगळा सेटअप तयार केला आहे, जेणेकरून त्याचा वेटिंग पीरियड कमीत कमी ठेवता येईल. ही कंपनीची भारतातील पहिली EV स्कूटर असेल. सध्या कंपनीने त्याच्या किमतींबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. अंदाजे १ लाख रुपयांच्या एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किमतीत ही ऑफर केली जाऊ शकते.