Honda Activa going to be discontinued!:  प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी होंडाची Activa स्कूटर ही देशात खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. विशेष करून तरुणाईची या स्कूटरला मोठी पसंती आहे. यामुळेच बाजारात या स्कूटरला मोठी मागणी असून ही देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कूटरपैकी एक आहे. पण आता होंडा एक मोठा बदल करणार आहे. Activa चे शेवटचे मॉडेल Honda Activa 6G असेल. कारण, आता Activa 7G बाजारात येणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. आता Activa सोबत इतर कोणतेही बॅजिंग येणार नाही. नुकत्याच समोर आलेल्या स्कूटरच्या छायाचित्रांवरून हे स्पष्ट होते. कंपनीने अद्याप याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. तसेच अ‍ॅक्टिव्हाचे नाव आता बदलले जाईल की फक्त बॅजिंगवरून जनरेशन मार्क काढून टाकले जाईल हेही सांगण्यात आलेले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही काळ अ‍ॅक्टिव्हाचे नवीन मॉडेल लाँच झाल्याच्या बातम्याही येत होत्या. पण आत्तापर्यंत कंपनीने नवीन स्कूटरबाबत कोणतेही अपडेट जारी केलेले नाही. आता असे मानले जात आहे की, नवीन अॅक्टिव्हा या वर्षाच्या अखेरीस लाँच होऊ शकते परंतु त्याचे नाव बदलेल की नाही, याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही.

एच स्मार्ट लाँच

यापूर्वी जानेवारी २०२३ मध्ये कंपनीने Activa H Smart लाँच केले होते. स्कूटरमध्ये वैशिष्ट्यांमध्ये बदल झाला आणि रिमोट लॉकिंग सिस्टमसह अपग्रेड करण्यात आला. भारतात या स्कूटरची सुरुवातीची किंमत ७४,५३६ रुपये एक्स-शोरूम ठेवण्यात आली होती.

(हे ही वाचा : आपल्याच Kia Seltos चा खेळ खल्लास करणार ‘ही’ नव्या अवतारात देशात दाखल झालेली कार, फीचर्सही तगडे, किंमत… )

बदल करण्याचे कारण काय?

कंपनी यापुढे नवीन पिढीला Activa बॅजिंग अंतर्गत लाँच करू इच्छित नाही. स्कूटरला पूर्णपणे नवीन लूक आणि फीचर्स देण्यासोबतच कंपनी ती एका नवीन प्लॅटफॉर्मवर लाँच करण्याचा विचार करत आहे.

यामुळे होंडाच्या स्कूटर ब्रँडला हानी पोहोचण्याची शक्यता नसली तरी नवीन स्कूटर देखील अ‍ॅक्टिव्हा सारख्याच प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल. यामुळे, ना त्याच्या चाहत्यांच्या संख्येत फारसा फरक पडणार आहे ना त्याच्या कामगिरीत. उलट, स्कूटरला फीचर्ससह अपडेट केल्यास त्याचा परफॉर्मन्स अधिक चांगला होईल. हे करण्यासोबतच अ‍ॅक्टिव्हा ही बाजारपेठेतील इतर वैशिष्ट्यांनी सज्ज असलेल्या स्कूटरशीही स्पर्धा करू शकणार आहे. नव्या अ‍ॅक्टिव्हाची थेट स्पर्धा Suzuki Avenis, टीव्हीएस एन टॉर्क या स्कूटर्सशी असेल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honda activa going to be discontinued now 7g model will not come know every new update related to scooter pdb
Show comments