Honda Activa Second Hand Offers: देशातील सर्वात प्रसिद्ध दुचाकी होंडा ऍक्टिव्हाही कित्येक वर्षांपासून सर्वाधिक विक्रीचे विक्रम रचत आहे. या स्कुटीच्या डिझाईन व मायलेजमुळे दुचाकीच्या बाजारात ऍक्टिव्हाचा दबदबा आहे. दिवाळीनंतरही होंडाच्या बेस्ट सेलिंग ऍक्टिव्हावर आपण भन्नाट सूट मिळवू शकता. यंदा वर्षाअखेरीस तुमच्या बाईक, स्कुटरच्या ताफ्यात एक नवीन पाहुणा आणू इच्छित असाल तर आपल्यासाठी बजेट फ्रेंडली अशी एक भन्नाट योजना आज आपण पाहणार आहोत. अवघ्या १५ हजारात आपण एक भन्नाट डील वापरून Honda Activa आपल्या दारात आणू शकता. काय आहे ही डील व ऍक्टिव्हा खरेदीसाठी तुम्ही बजेट कसे आखू शकता हे जाणून घेऊयात.
जर आपण होंडा ऍक्टिव्हा शो रूम मधून विकत घेणार असाल तर आपल्याला स्कुटीसाठी ७२ हजार ४०० रुपये मूळ रक्कम भरावी लागणार आहे मात्र इतर खर्च पकडून आपल्याला आरामात ७५ हजार ४०० पर्यंत खर्च येऊ शकतो. मात्र जर आपले एवढे बजेट नसेल किंवा आपण नवीनच गाडी शिकल्याने सेकंड हॅन्ड मॉडेल घेऊ इच्छित असाल तर त्यासाठी या तीन स्कीम विचारात घेऊ शकता.
सेकंड हॅन्ड होंडा ऍक्टिव्हासाठी OLX वर अनेक ऑफर उपलब्ध आहेत. OLX वर २०१४ चे दिल्लीच्या नंबर प्लेटसह एक मॉडेल लिस्ट करण्यात आले आहेत. यात स्कुटरची रक्कम अवघी १५ हजार इतकीच ठेवण्यात आली आहे. यात ऑफर किंवा प्लॅन शिवाय आपण फक्त १५ हजार गाडी खरेदी करू शकता. मूळ मालकाने या गाडीची स्थिती उत्तम असल्याचे सांगितले आहे.
होंडा ऍक्टिव्हा सेकंड हॅन्ड मॉडेल साठी DROOM वेबसाईटवर २०१५ चे मॉडेल लिस्ट करण्यात आले आहे. या स्कुटरची किंमत २२ हजार इतकी असून यासाठी आपल्याला विविध फायनान्स प्लॅन उपलब्ध होऊ शकतात.
(७ हजाराच्या EMI वर मिळवा बेस्ट मायलेज कार; Maruti Alto 800 ची दिवाळी स्पेशल ऑफर पाहा)
होंडा ऍक्टिव्हावरील तिसरी ऑफर BIKES4SALE या वेबसाईटवर देण्यात आली आहे. होंडा ऍक्टिव्हाचे हे २०१६ चे मॉडेल लिस्ट करण्यात आले असून याची किंमत २७ हजार इतकी ठेवण्यात आले आहे.
टीप- वरील पैकी सर्व डील या आपले पैसे वाचवण्याच्या दृष्टीने उत्तम ठरू शकतात मात्र खरेदीपूर्वी आपण सेकंड हॅन्ड होंडा ऍक्टिव्हा स्कुटर घेताना गाडीची अवस्था, इंजिन, कागदपत्रे नीट तपासून घेण्याची गरज आहे.