दुचाकींच्या विक्रीचा विचार केला तर मोटारसायकलला सर्वाधिक मागणी आहे. मात्र, काही स्कूटर्स अशाही आहेत, ज्या सतत बाईकला टक्कर देत असतात. या सेगमेंटमध्ये अशीच एक स्कूटर आहे, ज्याच्या समोर बजाज पल्सर आणि होंडा युनिकॉर्न सारख्या लोकप्रिय बाईक्स देखील फिक्या पडतात. ३० दिवसांत १.३० लाख लोकांनी ही स्कूटर खरेदी केली आहे. चला तर पाहूया कोणती आहे ही स्कूटर…

Honda Activa ही जून महिन्यात भारतात सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर ठरली आहे. या स्कूटरने आपल्या सेगमेंटमध्ये TVS Jupiter, Suzuki Access, TVS Ntorq, Ola S1 आणि TVS iQube सारख्या लोकप्रिय स्कूटर आणि इलेक्ट्रिक स्कूटर्सना मात दिली आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच जून महिन्यात १ लाख ३० हजारांहून अधिक ग्राहकांनी ती खरेदी केली. गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत या मॉडेलच्या विक्रीतही २९ टक्क्यांनी घट झाली आहे. जून २०२२ मध्ये, Activa १.८४ लाखांहून अधिक ग्राहकांनी खरेदी केली होती. मात्र, असे असूनही त्याची विक्री आजही सर्वाधिक आहे.

Mega Housing Lottery application process, entension, CIDCO
सिडकोच्या २६ हजारांच्या महागृहनिर्माण सोडत प्रक्रियेला महिन्याभराची मुदतवाढ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
dsp meets vegetable vendor friend in bhopal
१४ वर्षांनंतर डीएसपींनी भाजीवाल्या मित्राला शोधून काढलं, गाडीतून उतरले आणि गळाभेट घेतली; भावनिक Video व्हायरल!
Nashik Voting, satellite phone, polling stations in Nashik district , Nashik latest news,
मतदानाच्या माहितीसाठी १० उपग्रहाधारित फोन, ८८ धावपटूंचा वापर, नाशिक जिल्ह्यात १०३ मतदान केंद्र संपर्कहिन
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
aishwarya narkar slams netizen who writes bad comments
“आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”
Tata Motors profit falls 11 percent as vehicle sales decline
वाहनांची विक्री घसरल्याने टाटा मोटर्सच्या नफ्यात ११ टक्के घट;  दुसऱ्या तिमाहीत ३,३४३ कोटी रुपयांवर

TVS ज्युपिटर ही जून महिन्यात ६४,२५२ युनिट्सच्या विक्रीसह देशात सर्वाधिक विक्री होणारी दुसरी स्कूटर होती. त्यानंतर सुझुकी ऍक्सेस ३९,५०३ युनिट्स, TVS Ntorq २८,०७७ युनिट्स, Ola S1 सिरीज इलेक्ट्रिक स्कूटर १७,५७९ युनिट्स, TVS iQube इलेक्ट्रिक १४,४६२ युनिट्स आणि Yamaha Razr १३,४४१ युनिट्सवर होते.

(हे ही वाचा : Hero ने एक लिटर पेट्रोलमध्ये ६८ किमी धावणारी बाईक केली बंद, आता ग्राहकांकडे कोणता पर्याय? )

Honda Activa ची किंमत

ही स्कूटर Activa 6G आणि Activa 125 या दोन मॉडेलमध्ये येते. Honda Activa 6G मॉडेलच्या स्टँडर्ड व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत ७६,२३३ रुपये आहे, DLX व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत आहे ७८,७३४ रुपये आणि H-Smart व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत ८२,२३४ रुपये आहे.

Honda Activa 125 Drum व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत ७९,८०६ रुपये आहे, Drum Alloy व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत आहे ८३,४७४ रुपये, डिस्क व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत ८६,९७९ रुपये आहे आणि H-Smart व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत आहे. ८८,९७९ रुपये आहे.