ऑटो क्षेत्रातील कारच्या दुनियेत सध्या एसयुव्ही गाड्यांचा बोलबाला आहे. असं असलं तरी सेडान कारही मागे नाहीत. भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेत हॅचबॅक, सेडान आणि एसयूव्ही अशा विविध सेगमेंटमध्ये मोठ्या संख्येत कारचे पर्याय ग्राहकांसमोर आहेत. एसयूव्ही सेगमेंटच्या कारची मागणी अलीकडे वाढली असली तरी गेल्या अनेक वर्षांपासून सेडान सेगमेंटच्या कार भारतीयांची पहिली पसंती राहिल्यात. अजूनही स्टायलिश डिझाइनसह जास्त स्पेसमुळे अनेकजण सेडान कारलाच प्राधान्य देतात. आज आम्ही तुम्हाला भारतीय बाजारपेठेत कोणत्या सेडान कारची मागणी वाढली आहे, याबद्दल माहिती देत आहोत. आठ लाखांपेक्षा कमी किमतीच्या सेडान कारची देशातील बाजारात चांगली मागणी आहे. तुम्हीही सेडान कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.
सेडान कार कुटुंबासाठी सर्वोत्तम आहेत, ही वाहने प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांसह आरामदायी राइड देतात.देशातील बाजारात दमदार मायलेजसह अन् उत्तम फीचर्ससह येणाऱ्या एका परवडणाऱ्या सेडान कारला चांगली मागणी आहे. ही पाच आसनी कार आहे, ज्यामध्ये सामान ठेवण्यासाठी ४२० लीटरची बूट स्पेस आहे. कारला स्टायलिश फ्रंट ग्रिल आणि हेडलाइट्स देण्यात आले आहेत.
(हे ही वाचा : हिरोची मोठी खेळी! Shine 100, CT 100 चा डाव उलटणार? नव्या रुपात आणली ‘ही’ बाईक; १ लिटर पेट्रोलमध्ये धावते ७३ किमी, किंमत.. )
प्रमुख वाहन निर्माता कंपनी होंडाची Honda Amaze ही या सेडान सेगमेंटमधील बाजारात परवडणारी कॉम्पॅक्ट सेडान कार आहे. होंडाची ही स्मार्ट कार ७.२८ लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहे. कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते. कंपनीचा दावा आहे की, ही कार जास्तीत जास्त १८.६ kmpl मायलेज देते. कारचे टॉप मॉडेल ऑन-रोड ११.९६ लाख रुपये आहे. सध्या बाजारात त्याचे फक्त पेट्रोल व्हेरिएंट उपलब्ध आहे. कारमध्ये डिझेल आणि सीएनजी प्रकार उपलब्ध नाहीत.
चार प्रकार आणि उच्च पॉवर इंजिन
Honda Amaze मध्ये ११९९ cc इंजिन दिले जात आहे, ही कार ९० PS चा पॉवर आणि ११० Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. किमतीच्या विभागात ही कार टाटा टिगोर, ह्युंदाई ऑरा आणि मारुती सुझुकी डिझायर यांच्याशी स्पर्धा करते. कार चार प्रकारांमध्ये येते: LXi, VXi, ZXi आणि ZXi+. कारमध्ये ३६० कॅमेरा आणि ISOFIX चाइल्ड सीट अँकर सारखी प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.
Honda Amaze ची वैशिष्ट्ये
कारमध्ये ५-स्पीड गिअरबॉक्स आहे.
कारमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले सिस्टीम आहे
ऑटो-एलईडी प्रोजेक्टर हेडलाइट्स
७-इंच टच स्क्रीन प्रणाली
क्रूझ कंट्रोल आणि पॅडल शिफ्टर्स
एअरबॅग आणि अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम
इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण आणि मागील पार्किंग सेन्सर्स