Honda Amaze Sales: आघाडीची कार उत्पादक कंपनी होंडा सध्या कठीण काळातून जात आहे. कंपनीला भारतात विकल्या गेलेल्या ५ पैकी ३ कार बंद कराव्या लागल्या आहेत. कंपनीने अलीकडेच Jazz, WR-V आणि 4th जनरेशन Honda City बंद केली आहे. विक्रीत मोठी घट झाल्याने या तिन्ही गाड्या बंद कराव्या लागल्या. दरम्यान, कंपनीची एक कार देखील आहे जी विक्रीचे नवीन आयाम निर्माण करत आहे. ही कंपनीची होंडा अमेझ सेडान कार आहे. होंडा अमेझला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीने विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, गेल्या १० वर्षांत ५.३ लाखांहून अधिक ग्राहकांनी Honda Amaze खरेदी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Honda Amaze चा मार्केटमध्ये दबदबा

विशेष बाब म्हणजे, एकट्या Honda Amaze ने कंपनीच्या एकूण विक्रीत ५३ टक्क्यांच्या वाटा उचलला आहे. Honda Amaze भारतात प्रथमच एप्रिल २०२३ मध्‍ये लाँच झाली होती. पहिल्या पिढीतील Honda Amaze २०१८ पर्यंत विकली गेली. या ५ वर्षांत या कारच्या २.६ लाख युनिट्सची विक्री झाली. यानंतर, त्याचे दुसरे जनरेशन मॉडेल मे २०१८ मध्ये लाँच केले गेले आणि या मॉडेलने आतापर्यंत २.७ लाख कार विकल्या आहेत. सध्‍या होंडाच्‍या भारतीय बाजारपेठेत फक्त दोन वाहने उरली आहेत, त्‍यापैकी एक Honda Amaze आणि दुसरी Honda City आहे.

(हे ही वाचा : मोठी बातमी! ओलाने सर्वात जास्त विकणाऱ्या ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमतीत केली ५ हजारांची कपात )

Honda Amaze किंमत

भारतात Honda Amaze सेडानची किंमत ६.९९ लाख रुपयापासून सुरू होते आणि टॉप-एंड मॉडेलसाठी ९.६० लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. ही सेडान कार ई, एस आणि व्हीएक्स या तीन प्रकारांमध्ये विकली जाते. या सेडानमध्ये जास्तीत जास्त ५ लोक बसू शकतात.