Honda launches New Amaze : होंडा कार्स इंडियाने लोकप्रिय सेडान अमेझचे (Honda Amaze) थर्ड जनरेशन मॉडेल अधिकृतपणे लाँच केले आहे. या मॉडेलची किंमत आठ लाखांपासून ते १०.९० लाख रुपयांपर्यंत असणार आहे. पण, या किमती फक्त ४५ दिवसांपर्यंत वैध असणार आहेत. तसेच होंडाने सेडान अमेझसाठी ऑफलाइन बुकिंग सुरू केली असून, त्याची डिलिव्हरी जानेवारीमध्ये सुरू होईल. तसेच सेडान अमेझ व्ही (V), व्हीएक्स (VX) व झेडएक्स (ZX) या तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आली आहे. तसेच सेडान अमेझ रेडियंट रेड मेटालिक, ऑब्सिडियन ब्ल्यू पर्ल, गोल्डन ब्राउन मेटॅलिक, मेटिओरॉइड ग्रे मेटॅलिक, लुनर सिल्व्हर मेटॅलिक व प्लॅटिनम व्हाइट पर्ल आदी सहा रंगांमध्ये उपलब्ध असेल. तर सेडान अमेझच्या व्हेरिएंटची किंमत, डिझाईन, फीचर्स याबद्दल आपण या बातमीतून सविस्तर जाणून घेऊ…
होंडा अमेझ (Honda Amaze) किंमत
सेडान अमेझ, मारुती सुझुकी डिझायरला टक्कर देणार आहे, ज्याची किंमत ६.७९ ते १०.१४ लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) असणार आहे. या किमतीच्या पलीकडे, Dzire Amaze वर CNG व्हेरियंट ऑफरसह अतिरिक्त फायदा दिला जाईल.
होंडा सेडान अमेझ (Honda Amaze) | मॅन्युअल | सीव्हीटी (ऑटोमॅटिक) |
V | ८ लाख रुपये | ९.२० लाख रुपये |
VX | ९.१० लाख रुपये | १० लाख रुपये |
ZX | ९.७० लाख रुपये | १०.९० लाख रुपये |
इंजिन
थर्ड-जनरेशन अमेझमध्ये १.२ i-VTEC पेट्रोल इंजिन ६००० rpm वर ८८.५ बीएचपी (88.5 bhp) पॉवर आणि ४८००० (4800 rpm) वर ११० एनएम (110 Nm) टॉर्क जनरेट करते. ट्रान्स्मिशनसाठी या इंजिनामध्ये 5-स्पीड मॅन्युअल किंवा CVT गिअरबॉक्सचा पर्याय, पॅडल शिफ्टर्स दिले आहेत. Honda च्या मते, मॅन्युअल व्हर्जन रिटर्न्स १८.६५ केएमपीएल आणि १९.४६ CVT ऑफर करते.
होंडा अमेझ (Honda Amaze) फीचर्स
लेन कीप असिस्ट, रोड डिपार्चर मिटिगेशन, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, कोलिजन मिटिगेशन ब्रेकिंग सिस्टीम, ऑटो हाय बीम व लीड कार डिपार्चर नोटिफिकेशन सिस्टीम आदी फीचर्स दिली जाणार आहेत. लेव्हल 1 ADAS वैशिष्ट्य असलेली ही देशातील सर्वात स्वस्त आणि Honda होंडा अमेझ सेग्मेंटमधील पहिली सेडान असणार आहे. सेग्मेंट-फर्स्ट लेनवॉच कॅमेरा, सहा एअरबॅग्ज, हिल स्टार्ट असिस्ट, व्हेईकल स्टॅबिलिटी असिस्ट व रिअर पार्किंग सेन्सर्स, मल्टी-एंगल रिअर पार्किंग कॅमेरा, ISOFIX अँकरेज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम आणि इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन व इमर्जन्सी स्टॉप सिग्नल ही अतिरिक्त फीचर्ससुद्धा दिली जाणार आहेत.
केबिनमध्ये वायरलेस ॲण्ड्रॉईड ऑटो आणि ॲपल कारप्लेसह ८-इंच इन्फोटेन्मेंट सिस्टीम, ड्रायव्हरच्या कन्सोलसाठी ७-इंचाचा टीएफटी डिस्प्ले, एक वायरलेस फोन चार्जर, पीएम २.५ हवा शुद्ध करणारे फिल्टर, स्वयंचलित हवामान नियंत्रण, सहा स्पीकर्स म्युझिक सिस्टीम व यूएसबी चार्जिंग पोर्ट आणि नवीन अमेझमध्ये ४१६ लीटरची बूट स्पेस आहे.
होंडा अमेझ (Honda Amaze) डिझाईन :
होंडा अमेझच्या नवीन मॉडेलला त्यांची पारंपरिक बॉक्सी डिझाईन न देता, सिटीसारखा लूक दिला आहे. त्यात एलिव्हेट-इन्स्पायर्ड हनीकॉम्ब फ्रंट ग्रिल, स्लीक ट्विन-पॉड एलईडी हेडलाइट्स व क्रोम-फिनिश्ड हुड आहे. एक कॅरेक्टर लाइन हेडलाइट्सपासून एलईडी टेललाइट्सपर्यंत पसरलेली आहे. या गाडीला १५-इंच अलॉय व्हील्स, एलईडी फॉग लँप्स व नवीन एलईडी टेल लॅम्प क्लस्टरदेखील आहे.