Honda Amaze Offer Factory Fitted CNG Option To Buyer : होंडा कार्स इंडियाने लोकप्रिय सेडान अमेझचे (Honda Amaze) थर्ड जनरेशन मॉडेल अधिकृतपणे लाँच केले आहे. पण, सेडान अमेझमध्ये कंपनीच्या आधीच्या मॉडेलप्रमाणे फॅक्टरी-इन्स्टॉल सीएनजी किटसह (CNG Kit) येत नाही. त्याऐवजी ग्राहकांनी खरेदी केल्यानंतर डीलरशिपमध्ये सीएनजी किट विकत घेऊ शकतात.
ही प्रोसेस कशी करायची (Here’s how the process works)
फॅक्टरी-फिटेड सीएनजी पर्याय उपलब्ध करून देणारी अमेझ केवळ पेट्रोल इंजिनसह कारखान्यात उपलब्ध असेल. तुम्हाला पेट्रोल व्हर्जनचे सीएनजीमध्ये रूपांतर करण्यात मदत करण्यासाठी Honda ने स्थानिक मान्यताप्राप्त (local approved ) CNG रूपांतरण सुविधांबरोबर पार्टनरशिप (भागीदारी) केली आहे, ज्यामुळे डीलरशिप ग्राहकांसाठी प्रक्रिया अगदी सोपी करून देते आहे.
तुम्हाला तुमची Honda Amaze पेट्रोल आणि CNG दोन्हीवर चालवायची असेल, तर तुम्हाला आधी पेट्रोल व्हर्जन खरेदी करावे लागेल आणि नंतर ते डीलरशिपवर रुपांतरित करावे लागेल. बहुतेक Honda डीलरशिपने या सुविधांसह पार्टनरशिप आधीच केली आहे, कारण त्यांनी पूर्वीच्या Amaz मॉडेलसाठी समान गोष्टी ऑफर केल्या आहेत.
जरी सीएनजी रूपांतरण थेट कारखान्यात केले जात नाही, तरीही तुमचे वाहन निर्मात्याच्या वॉरंटीद्वारे संरक्षित केले जाईल. रूपांतरण करण्याची किंमत साधारणपणे एक लाख रुपये असते. पण, स्थानिक करांच्या आधारावर किंमत बदलूसुद्धा शकते. फॅक्टरी वॉरंटी अबाधित ठेवण्यासाठी, रूपांतरण पूर्ण झाल्यावर खरेदीदारांनी डीलरशिपवर काही अतिरिक्त कागदपत्रे भरणे आवश्यक आहे, त्यानंतर डीलरशिप अधिकृतपणे त्याचे इंधन प्रकार पेट्रोल-सीएनजीमध्ये बदलण्यासाठी वाहन आरटीओकडे परत घेऊन जाईल.
पर्फोमन्सबद्दल बोलायचे झाले तर Amaze मध्ये 90hp १.२ लिटर पेट्रोल इंजिन आहे, पण लक्षात ठेवा की जर तुम्ही CNG रूपांतर केल्यास पॉवरमध्ये थोडीशी घट दिसून येईल, जी CNG वाहनांमध्ये सामान्य आहे. हे रूपांतरण केवळ अमेझच्या मॅन्युअल व्हर्जन (manual version) साठी उपलब्ध आहे. नवीन Honda Amaze ची किंमत ८ लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलसाठी १०.९० लाख (एक्स-शोरूम, भारत) रुपयांपर्यंत जाते. चाचणी ड्राइव्ह पुढील आठवड्यात सुरू होतील. तसेच ऑफलाइन बुकिंग सुरू केली असून, त्याची डिलिव्हरी जानेवारीमध्ये सुरू होईल.