Honda City on Discount: जपानी ऑटोमेकर Honda Motors ने फेब्रुवारी २०२३ चा डिस्काऊंट जाहीर केला आहे. फेब्रुवारी महिन्यात कंपनी त्यांच्या पाचव्या जनरेशन सिटी सेडानवर मोठ्या सवलतीच्या ऑफर देत आहे. ज्यामध्ये रोख सवलत किंवा अतिरिक्त अॅक्सेसरीज, एक्सचेंज बोनस, ग्राहक लॉयल्टी बोनस, होंडा कार एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंटच्या रूपात ७२,४९३ रुपयांपर्यंत सूट देत आहे.
तीन प्रकारांमध्ये उपलब्ध
होंडा सिटी V, VX आणि ZX या तीन प्रकारांमध्ये बाजारात उपलब्ध आहे. ज्यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. या मध्यम आकाराच्या सेडानची एक्स-शोरूम किंमत ११.८७ लाख ते १५.६२ लाख रुपये आहे.
(हे ही वाचा : रतन टाटांची ड्रीम कार ५० हजारामध्ये आणा घरी, पाहा कुठे मिळतेय डील )
Honda City वर किती सूट मिळते?
कंपनीला पाचव्या जनरेशन सिटी सेडानचा स्टॉक एप्रिल २०२३ पर्यंत क्लिअर करायचा आहे. म्हणूनच डीलर्स या कार्सवर डिस्काऊंट्स देत आहेत. स्टॉक एप्रिल २०२३ पर्यंत क्लिअर करायचा आहे. म्हणूनच डीलर्स या कार्सवर डिस्काऊंट्स देत आहेत.
Honda City (MT) ला ३०,००० रुपयांपर्यंत रोख सवलत किंवा ३२,४९३ रुपयांपर्यंत FOC अॅक्सेसरीज, २०,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस, ५,००० रुपयांचा ग्राहक लॉयल्टी बोनस, ७,००० रुपयांपर्यंतचा Honda कार एक्सचेंज बोनस आणि ८,००० रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट मिळते. दुसरीकडे, त्याच्या CVT मॉडेलवर २०,००० रुपयांपर्यंत रोख सवलत किंवा २१,६४३ रुपयांपर्यंत FOC अॅक्सेसरीज, २०,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस, ५,००० रुपयांचा ग्राहक लॉयल्टी बोनस, ८,००० रुपयांची कॉर्पोरेट सूट आणि Honda कार एक्सचेंजमध्ये मिळत आहे.