Honda ही एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. होंडा आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन कार्स लॉन्च करत असते. मात्र कार्बन मिशन नॉर्म्स (उत्सर्जन मानदंड नियम) लागू झालयावर कंपनीने आपल्या गाड्यांच्या किंमतीमध्ये वाढ केली होती. आता पुन्हा एकदा होंडा कार्स इंडियाने गाड्यांच्या किंमतीमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने कोणकोणत्या गाड्यांच्या किंमतीमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे ते पाहुयात.
होंडा कार्स इंडियाने आपल्या सेडान कार होंडा सिटी आणि होंडा अमेझच्या किंमतीमध्ये जून महिन्यापासून १ टक्क्यांची वाढ होणार आहे. होंडा कार्स इंडियाचे उपाध्यक्ष (सेल्स अँड मार्केटिंग) कुणाल बहलने आपल्या निवेदनामध्ये म्हटले, ”खर्चात झालेली वाढ अंशतः भरून काढण्यासाठी आम्ही जून महिन्यापासून सिटी आणि अमेझच्या किंमतीमध्ये १ टक्क्याने वाढ करण्याची योजना आखत आहोत.” ही आधी वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये वेगवेगळी असणार आहे. याबाबतचे वृत्त बिझनेस टूडे ने दिले आहे.
होंडा सिटी आणि अमेझच्या किंमती
सध्या होंडा अमेझची किंमत ही ६.९९(एक्सशोरूम, दिल्ली) लाख रुपयांपासून ९.६ लाख रुपयांपर्यंत आहे. तर होंडा सिटीची किंमत ११.५५ (एक्सशोरूम, दिल्ली) लाख रुपयांपासून २०. ३९ लाख रुपयांपर्यंत आहे. मध्यम आकाराच्या सेडानवर हायब्रीड ट्रिम्सच्या किंमती वाढीचा परिणाम होणार नाही.
देशातील एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी असणाऱ्या होंडा कार्स इंडिया लिमिटेड (HCIL) कंपनीने एक घोषणा केली आहे. कंपनीच्या आगामी लॉन्च होणाऱ्या SUV ला Honda Elevate असे नाव देण्याची घोषणा होंडा कंपनीने केली आहे. Elevate ही कंपनीची नवीन माध्यम आकाराची एसयूव्ही आहे. ही एसयूव्ही ६ जून रोजी लॉन्च केली जाणार आहे.