Honda Cars India ने ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांच्या निवडक कारच्या किमतीत वाढ जाहीर केली आहे. कंपनीने ज्या कारच्या किमती वाढवल्या आहेत त्यात ऑल न्यू होंडा सिटी, होंडा सिटी eHEV, Honda Amaze, Honda Jazz आणि Honda WR V यांचा समावेश आहे.

जर तुम्हीही होंडा कार घेण्याचा विचार करत असाल तर त्याआधी जाणून घ्या Honda Cars India ने त्यांच्या कारची किंमत किती वाढवली आहे.

Top 5 best budget cars with 6 airbags
‘या’ आहेत सहा एअरबॅग असलेल्या टॉप ५ सर्वोत्तम बजेट कार, जाणून घ्या किंमत अन् खास फिचर्स
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
petrol Diesel price Marathi news
Daily Fuel Prices Change : आज महाराष्ट्रात कमी झाले पेट्रोल-डिझेलचे भाव, पाहा तुमच्या शहरांत काय आहे स्थिती?
Daily petrol diesel price on 17 December
Petrol Diesel Prices Today : महाराष्ट्रात वाढले का पेट्रोल-डिझेलचे दर, एका क्लिकवर जाणून घ्या तुमच्या शहरांतील नवे दर
Flipkart Year End Sale
Flipkart Year End Sale मध्ये कमी किंमतीमध्ये खरेदी करा Ather Rizta, जाणून घ्या सविस्तर
Petrol and Diesel Prices 15 December
Petrol And Diesel Price Today : तुमच्या शहरांत कमी झाला का पेट्रोल-डिझेलचा भाव? जाणून घ्या महाराष्ट्रात काय सुरु आहे एक लिटर इंधनाचा दर
Petrol and Diesel Prices 13 December In Marathi
Maharashtra Petrol Diesel Price : महाराष्ट्रातील कोणत्या शहरांत कमी झाला पेट्रोल-डिझेलचा भाव? तुमच्या शहरांतील एक लिटर इंधनाचा दर किती?
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स

Honda City eHEV: Honda ने आपल्या Honda City Hybrid मध्ये आपल्या कारच्या किमतीत सर्वात मोठी वाढ केली आहे. कंपनीने या कारची किंमत ३९,१०० रुपयांनी वाढवली आहे. कंपनीने केलेली वाढ या कारच्या सॉलिड कलर ZX व्हेरिएंटशिवाय इतर कोणत्याही व्हेरिएंटला लागू होणार नाही.

आणखी वाचा : BOOM CORBETT 14 ची TVS XL 100 सोबत तगडी स्पर्धा, १८० किमी रेंजचा दावा, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Honda Jazz: Honda Jazz ही कंपनीची लोकप्रिय आणि प्रीमियम हॅचबॅक कार आहे, जिच्या किमतीत कंपनीने ११ हजार रुपयांची वाढ केली आहे.

All New Honda City 5th Generation: कंपनीने सर्व-नवीन Honda City च्या पाचव्या एडीशनच्या किमती ११ हजार रुपयांनी वाढवल्या आहेत. कंपनीने वाढवलेली ही किंमत या कारच्या सर्व व्हेरिएंटवर लागू होईल.

Honda WRV: कंपनीने Honda WRV ची किंमत ११ हजार रुपयांनी वाढवली असून ही वाढ या कारच्या डिझेल व्हेरिएंटवर लागू होईल. कंपनीने या कारच्या पेट्रोल व्हेरिएंटच्या किमतीत वाढ केलेली नाही.

आणखी वाचा : केवळ ६८ हजार रूपये भरून घरी घेऊन जा Hyundai Santro Asta चा टॉप सेलिंग व्हेरिएंट, वाचा संपूर्ण ऑफर

Honda Amaze: Honda Amaze ही कंपनीच्या हॅचबॅक सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. कंपनीने या कारच्या डिझेल इंजिनसह बेस व्हेरिएंट E MT वगळता सर्व व्हेरिएंटच्या किमती ६,३०० रुपयांवरून ११ रुपयांपर्यंत वाढवल्या आहेत.

होंडा कार्स इंडियाने या कारच्या किमतीत वाढ केल्यानंतर देशातील विविध राज्यांमध्ये या गाड्यांची एक्स-शोरूम किंमत वेगवेगळी असेल. त्यामुळे कोणतीही कार खरेदी करण्यापूर्वी तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा तुमच्या जवळच्या Honda डीलरशिपला भेट देऊन नवीन किमतींबद्दल संपूर्ण माहिती मिळवू शकता.

Story img Loader