होंडा कार इंडियाने गुरुवारी अखेरीस अधिकृतपणे आपली Honda City e:HEV भारतीय बाजारपेठेत सादर केली. या गाडीबाबत कारप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता होती. Honda City ही भारतातील सर्वात जास्त विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे, पहिल्यांदा १९९८ मध्ये लाँच झाली होती. नवीन सिटी मॉडेल V आणि ZX या दोन ट्रिममध्ये ऑफर केले आहे. कारचे अधिकृत बुकिंग आजपासून म्हणजेच १४ एप्रिलपासून सुरू झाले आहे. भारतात त्याची विक्री मे २०२२ मध्ये सुरू होईल. Honda City Hybrid ही आता देशातील सर्वात इंधन कार्यक्षम मध्यम आकाराची सेडान बनली आहे. एका लिटर पेट्रोलमध्ये २६.५ किमी मायलेज देते. मायलेज पाहिल्यास होंडाची ही नवी कार मारुतीच्या सेलेरियोशी स्पर्धा आहे. मात्र, लूक आणि आकाराच्या बाबतीत सेलेरियो या नव्या होंडा कारसमोर स्पर्धेत नाही. मारुतीची सेलेरियो ही कार खूपच लहान आहे, तर होंडा सिटीची नवीन हायब्रीड कार दिसायला उत्तम आणि आकाराने मोठी आहे.

Honda City e:HEV दोन मोटर्ससह येते. कारमधील १.५ लिटर पेट्रोल इंजिन जनरेटर आणि ट्रॅक्शन मोटरशी जोडलेले आहे. या दोन्ही मोटर्स लिथियम बॅटरीला जोडलेल्या आहेत. त्याची पेट्रोल मोटर ९८ बीएचपी पॉवर आणि १२७ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. त्याच वेळी, इलेक्ट्रिक मोटर २५३ एनएण पीक टॉर्कसह १०९ बीएचपी पॉवर देते. होंडा सिटी हायब्रिड ०.७३४ किलोवॅटलिथियम-आयन बॅटरीद्वारे समर्थित आहे ज्याचे वजन १४.५ किलो आहे. कारच्या केबिनमध्ये ८ स्पीकर सिस्टम देण्यात आली आहे. यात स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह ८.० इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम, स्मार्ट की सिस्टीम, Amazon Echo आणि Google Assistant सोबत नवीनतम Honda Connect अ‍ॅप आहे. जे निवडक स्मार्टवॉच मॉडेल्सवर व्हॉइस कमांड फंक्शनसह सपोर्ट करते. ड्रायव्हर डिस्प्ले पूर्णपणे डिजिटल आहे आणि त्याला ऑटो लॉक फंक्शन देखील दिलं आहे.

भारतात Honda City Hybrid ची किंमत २२ लाख रुपये ते २५ लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान असू शकते. मध्यम आकाराच्या सेडान विभागात ही कार Hyundai Verna, Maruti Suzuki Ciaz, Skoda Slavia आणि Volkswagen Vertus यांच्याशी स्पर्धा करेल.

Story img Loader