Honda ही एक मोटारसायकल आणि स्कूटरची निर्मिती करणारी कंपनी आहे. होंडा कंपनी देशातील मोटारसायकल आणि स्कूटरची सर्वात मोठी विक्री करणारी कंपनी आहे. होंडा कंपनीने भारतीय बाजारपेठेमध्ये त्यांच्या दोन शक्तिशाली मोटारसायकल लॉन्च केल्या आहेत. या दोन कोणत्या बाईक्स आहेत या बद्दल जाणून घेऊयात.
होंडाने 2023 Honda H’ness CB350 आणि CB350RS या त्यांच्या शक्तिशाली दोन बाईक्स लॉन्च केल्या आहेत. यामध्ये तुम्हाला अनेक नवीन फीचर्स बघायला मिळणार आहेत. तसेच आगामी उत्सर्जन नियमाचे पालन देखील करतील. Honda ने H’ness CB350 आणि CB350RS मध्ये कोणतेही कॉस्मेटिक बदल केलेले नाहीत. परंतु H’ness CB350 मध्ये रेट्रो डिझाईन देण्यात आले आहे. दुसरीकडे, CB350RS ला स्क्रॅम्बलरकडून आक्रमक स्वरूपाचे डिझाईन देण्यात आले आहे. या दोन्ही बाइक्स LED लाइट्ससह येतात.
हेही वाचा : Hyundai Creta नव्या अवतारात दाखल, कंपनी केवळ ‘इतक्याच’ गाड्या विकणार, किंमत…
कंपनीने आपल्या दोन्ही बाइक्समध्ये इमर्जन्सी स्टॉप सिग्नल कनेक्ट केले आहेत. CB350RS आता Honda स्मार्टफोन व्हॉइस कंट्रोल सिस्टमसह येते. हे फिचर आधीपासूनच H’ness CB350 मध्ये उपलब्ध होते. H’ness CB350 ला आता स्प्लिट सीट सेटअप मिळतो.
काय आहे किंमत ?
H’ness CB350 बाईक तीन व्हेरिएंटमध्ये तुम्हाला खरेदी करता येणार आहे. DLX, DLX Pro आणि DLX Pro Chrome असे तीन व्हेरिएंट आहेत. ज्यांची एक्स-शो रूम किंमत ही २.१० लाखांपासून सुरु होते. तर CB350RS बाईकची किंमत ही एक्स शो रूम किंमत २.१५ लाखांपासून सुरु होते. ही बाईक DLX, DLX Pro आणि DLX Pro ड्युअल टोन या तीन व्हेरिएंटमध्ये तुम्ही खरेदी करू शकता.