Honda Elevate Apex Edition launched : जपानी ऑटोमेकर होंडा कार्सने भारतीय बाजारपेठेत कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये Elevate लाँच केली आहे. सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी कंपनीने या एसयूव्हीचे नवीन व्हर्जन Honda Elevate Apex Edition लाँच केले आहे, जेणेकरून ग्राहक ही एसयूव्ही खरेदी करण्याची तयारी करू शकतील. ही कार एक लिटर पेट्रोलमध्ये 17 किलोमीटर चालते. Apex Edition दोन प्रकारांमध्ये येते – V आणि VX – आणि 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि CVT मधील पर्याय देते, तर या नवीन एसयूव्हीमध्ये कोणत्या प्रकारचे फीचर्स देण्यात आले आहेत? त्याची किंमत काय आहे? याबद्दल सविस्तर बातमीतून जाणून घेऊ या…
Honda एलिव्हेटच्या ॲपेक्स एडिशनवर बोलताना कंपनीचे उपाध्यक्ष कुणाल बहल म्हणाले की, “भारतातील सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे आणि Honda Elevate चे आकर्षक किमतीचे नवीन Apex Edition सादर करताना आम्हाला आनंद होत आहे, ज्यात उत्तम केबिन इंटीरियर्स आहे. एसयूव्हीचा बाहेरील भाग डायनॅमिक आणि स्टाइलिश आहे. या नवीन आवृत्तीसह, आम्ही होंडा कुटुंबात आणखी ग्राहकांचे स्वागत करण्यास उत्सुक आहोत.”
हेही वाचा…Hyundai : शार्क-फिन अँटेना, डॅशकॅमसह बरीच फीचर्स; मार्केटमध्ये येतेय नवी SUV; किंमत फक्त…
नवीन अपडेट्स :
एसयूव्हीमध्ये एक्सटिरियर ते इंटिरियमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. Honda ने पियानो ब्लॅक फिनिश फ्रंट आणि सिल्व्हर फिनिशसह रियर बंपर, अतिरिक्त साइड क्लॅडिंगसह एक्सटीरियर्स वाढवले आहेत. तसेच फेंडर्सवर Apex Edition बॅज आणि टेलगेटवर Apex Edition चिन्ह आहे. ड्युअल-टोन आयव्हरी आणि ब्लॅक कलर कॉम्बिनेशन डोअर लाइनिंग लेदरेट, आयपी पॅनल्स आणि सीट कव्हर्सवर लेदररेटसह येतात. या व्हर्जनमध्ये, सात कलरच्या ऑप्शनसह एंबिएंट लाइटदेखील प्रदान करण्यात आला आहे.
आधी सांगितल्याप्रमाणे, Elevate Apex Edition ची किंमत साधारण Honda Elevate Standard पेक्षा १५ हजार रुपयांनी जास्त आहे. त्यामुळे आधीच्या व आत्ताच्या कार्समधील किमतीत किती फरक असेल त्यावर एक नजर टाकूया…
होंडा Elevate व्हेरिएंट | अपेक्स एडिशन | स्टॅंडर्ड |
व्ही एमटी | १२.८६ लाख | १२.७१ लाख |
व्ही सीव्हीटी | १३.८६ लाख | १३.७१ लाख |
व्हीएक्स एमटी | १४.२५ लाख | १४.१० लाख |
व्हीएक्स सीव्हीटी | १५.२५ लाख | १५.१० लाख |