Honda Elevate Black Edition Launch Date: भारतीय बाजारपेठेत सात सीटर एसयुव्ही आणि एमपीव्ही गाड्यांना नेहमीच मोठी मागणी असते. एकत्र कुटुंबपद्दती असल्याने भारतीय जास्त सदस्य बसू शकतील अशा गाड्यांना पसंती देत असतात. अलीकडच्या काळात ही मागणी फार वाढली असून त्यामुळे बाजारात सात सीटर कारची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळेच आता कंपन्याही त्यांच्या ५-सीटर SUV कारचे सात-सीटर मॉडेल्स लाँच करत आहेत. यातच कार निर्माता ह्युंदाई इंडिया सुध्दा देशातील बाजारात मोठा धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे. होंडा मोटर्स इंडिया एलिव्हेट मॉडेलचे ब्लॅक एडिशन लाँच करणार आहे. या नवीन एडिशनमध्ये कोणते नवीन फीचर्स पाहायला मिळतील आणि किंमत किती असेल? जाणून घेऊ सविस्तर..
काय असणार खास?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, होंडा मोटर्स इंडिया एलिव्हेटचे अपकमींग ब्लॅक एडिशन इंडियन मार्केटमध्ये कधी लाँच होईल याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या नवीन मॉडेलमध्ये मागच्या साईडला नवीन बॅज असेल. नवीन ब्लॅक एडिशन एलिव्हेटच्या डिझाइन आणि लुकमध्ये बरेच चेंजेस पाहायला मिळेल. याशिवाय यामध्ये ब्लॅक क्लॅडिंगही असेल.
कधी होणार लाँच?
१७ ते २२ जानेवारी दरम्यान होणाऱ्या भारत मोबिलिटी २०२५ मध्ये Honda Elevate Black Edition लाँच केली जाण्याची अपेक्षा आहे. या संदर्भात कंपनीकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. सध्याच्या Honda Elevate ची एक्स-शोरूम किंमत ११.६९ लाख रुपयांपासून सुरू होते आणि त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत १६.४३ लाख रुपये आहे तसेच Elevate Black Edition च्या किमतीत थोडी वाढ होऊ शकते.
हेही वाचा >> बापरे! फक्त ३० दिवसांत १.४५ लाख लोकांनी खरेदी केली ‘ही’ बाईक; ६५ हजाराच्या ‘या’ बाईकसाठी लोकांच्या रांगा
इंजिन आणि पॉवर
होंडा एलिव्हेट ब्लॅक एडिशन इंजिनमध्ये कोणताही बदल नसतील. त्यात १.५ लिटर कॅपेसिटीचे इंजिन वापरले जाईल यामध्ये दिलेले १.५ लीटर इंजिन १२१ पीएस पॉवर आणि १४५ न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करेल. होंडा एलिव्हेटची ब्लॅक एडिशन थेट ह्युंदाई क्रेटा क्नाईट एडिशन आणि एमजी हेक्टर ब्लॅक एडिशनशी स्पर्धा करेल.