Honda Elevate Crosses 1 Lakh Cumulative Sales: भारतीय बाजारपेठेत सात सीटर एसयुव्ही आणि एमपीव्ही गाड्यांना नेहमीच मोठी मागणी असते. एकत्र कुटुंबपद्दती असल्याने भारतीय जास्त सदस्य बसू शकतील अशा गाड्यांना पसंती देत असतात. अलीकडच्या काळात ही मागणी फार वाढली असून त्यामुळे बाजारात सात सीटर कारची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. अशातच होंडाने २०२३ मध्ये भारतीय बाजारपेठेत Elevate SUV लाँच केली आहे. होंडा एलिव्हेटला इंडियन मार्केटमध्ये जबरदस्त मागणी आहे. कंपनीसाठी ही एसयूव्ही लकी ठरली आहे. लाँच झाल्यापासून या कारने नुकताच एक लाख विक्रीचा टप्पा ओलांडला आहे. या आकडेवारीत डोमेस्टिक आणि इंटरनेशनल विक्रीचा समावेश आहे. आतापर्यंत होंडा एलिव्हेटने देशांतर्गत बाजारात ५३,३२६ युनिट्सची विक्री केली आहे, तर जगभरात ४७,६५३ युनिट्सची निर्यात करण्यात आली आहे. होंडा एलिव्हेट ही ‘मेड इन इंडिया’ एसयूव्ही आहे, जी उत्तम डिझाइन आणि चांगल्या फीचर्ससाठी ओळखली जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा