होंडा कार्स इंडिया ही एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. होंडा कंपनीने आपली Elevate ही एसयूव्ही अखेर भारतात लॉन्च केली आहे. होंडा एलिव्हेटचे जून महिन्यात जागतिक स्तरावर लॉन्च करण्यात आली होती. तसेच याचे प्री-बुकिंग देखील सुरु होते. एलिव्हेट ही पाच सीटर एसयूव्ही असून SUV SV, V, VX आणि ZX या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असणार आहे. कंपनीच्या या नवीन कारची किंमत १०.९९ लाख (एक्स-शोरूम) रुपयांपासून सुरू होते. होंडा एलिव्हेट किआ सेलटॉस, ह्युंदाई क्रेटा, मारुती सुझुकी ग्रँड विटारा, टोयोटा हायरायडर, स्कोडा कुशाक, फोक्सवॅगन Taigun या गाडयांना टक्कर देणार आहे. आज आपण एलिव्हेट फीचर्स,किंमत आणि स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत इतर गाड्यांच्या तुलनेत किती वेगळी आहे जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

होंडा एलिव्हेट आणि प्रतिस्पर्धी गाड्यांची किंमत

होंडा एलिव्हेटची किंमत १०.९९ लाख (एक्सशोरूम) रुपयांपासून ते १५.९९ लाख रुपयांमध्ये आहे. भारतीय बाजारात या गाडीला टक्कर देणाऱ्या गाड्यांच्या किंमती जाणून घ्यायच्या झाल्या तर ह्युंदाई क्रेटाची किंमत १०.९० लाख रुपये, स्कोडा कुशाकची किंमत ११.५९ लाख रुपये, फोक्सवॅगन Taigun ची किंमत ११.६२ लाख रुपये, मारुती सुझुकी ग्रँड विटाराची किंमत १०.७ लाख रुपये आहे. जर का आपण या सर्व गाड्यांच्या किंमती वाढल्या तर मारुती सुझुकी ग्रँड विटारा हे सर्वात स्वस्त वाहन आहे. होंडा एलिव्हेट ही मध्यम आकाराची एसयूव्ही आहे. किंमतीच्या बाबतीत ह्युंदाई क्रेटा देखील होंडा एलिव्हेटपेक्षा स्वस्त आहे. फोक्सवॅगन Taigun या लिस्टमध्ये सर्वात महाग गाडी आहे. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.

हेही वाचा : ह्युंदाई-किआचे धाबे दणाणले; होंडाची नवी SUV भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

इंजिन स्पेसिफिकेशन्स

होंडा एलिव्हेट, ह्युंदाई क्रेटा, किआ सेलटॉस यासह इथे दिलेल्या सर्व एसयूव्ही या पेट्रोल इंजिन येते. मात्र यातील ह्युंदाई क्रेटा आणि किआ सेलतोस या गाड्यांमध्ये डिझेल इंजिनचा देखील पर्याय मिळोत. बऱ्याच कोर्समध्ये १.५ लिटरचे नॅचरली एस्पिरेटेड किंवा टर्बोचार्ज इंजिन पर्याय मिळतो. स्कोडा कुशाक फोक्सवॅगन Taigun या दोन गाड्यांमध्ये १. लिटरच्या टर्बोचार्ज पेट्रोल इंजिनचा पर्याय देखील उपलब्ध आहे.

Image Credit- Financial Express

हेही वाचा : Petrol-Diesel Price on 6 September: आज राज्यात पेट्रोल-डिझेलचा दर किती? जाणून घ्या

फीचर्स आणि सेफ्टी

सेफ्टी आणि फीचर्स सेगमेंटमध्ये सर्व गाड्यांमध्ये अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. सर्व मॉडेलच्या टॉप व्हेरिएंट गॅजेट आणि फीचर्ससह सुसज्ज आहेत. सर्व गाड्यांमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हीटी आणि टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम मिळते. यामध्ये नेव्हिगेशन, कनेक्टड कार टेक, कूल्ड सीट सारखे फिचर मिळतात. सुरक्षेच्या बाजूने पाहिल्यास अनेक एअरबॅग्स, ABS आणि EBD, स्टॅबिलिटी कंट्रोल, ३६० डिग्री कॅमेरे, रिव्हर्स कॅमेरा, रिव्हर्स सेन्सर्स यांसाखे सेफ्टी फीचर्स मिळतात. या सेगमेंटमध्ये केवळ होंडा एलिव्हेट आणि नवीन किआ सेलटॉसमध्येच ADAS हे फिचर मिळते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honda elevate features price engine competition with creta grand vitara seltos check details tmb 01
Show comments