भारतीय बाजापेठेत सध्या SUV ची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे अनेक कंपन्या SUV बाजारात लॉन्च करत आहेत. आपल्याकडे मिडसाईज एसयूव्हीची बाजारपेठ खूप मोठी आहे आणि या सेगमेंटमध्ये अनेक वाहने आहेत. अशातच नुकतीच नव्या आणि हटके फीचर्ससह देशात एक एसयुव्ही दाखल झाली आहे. ज्या कारची चर्चा देशभरात होत आहे. या कारच्या अनोख्या वैशिष्ट्यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि या मध्यम आकाराच्या एसयूव्हीने विक्रीच्या बाबतीत मोठा विक्रम केला आहे.
यावर्षी भारतात लाँच झालेल्या होंडाच्या कारला देशभरातून मोठी मागणी आहे. Honda च्या मध्यम आकाराच्या SUV ने लाँच केल्याच्या अवघ्या १०० दिवसांत २०,००० हून अधिक युनिट्स विकल्या आहेत. इतक्या कमी वेळेत एवढी विक्री गाठणे ही कोणत्याही नवीन SUV साठी मोठी गोष्ट आहे. स्वत:चा वेगळा ठसा उमटवण्यात ही कार यशस्वी होत आहे.
या SUV ला गेल्या तीन महिन्यात खूप पसंती मिळाली आणि त्यामुळेच कंपनीच्या एकूण विक्रीत होंडाच्या या कारचा वाटा ५० टक्क्यांहून अधिक होता. यावरून हे सहज समजू शकते की, या एसयुव्हीची क्रेझ किती वाढत आहे आणि लोकं एवढ्या मोठ्या संख्येने या कारची खरेदी करत आहेत.
(हे ही वाचा : बाजारपेठेत उडाली खळबळ, Yamaha च्या दोन नव्या बाईक देशात दाखल; पाहा किंमत… )
होंडाच्या ‘या’ कारला बाजारपेठेत मोठी मागणी
होंडाच्या या एसयूव्हीने ग्राहकांमध्ये आपले खास स्थान निर्माण केले आहे, अशा परिस्थितीत आता या एसयूव्हीची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात आहे. भारतीय बाजारात Honda Elevate SUV चा बोलबाला पाहायला मिळतोय. ही एसयूव्ही ह्युंदाई क्रेटा, किया सेलटॉस, ग्रँड विटारा आणि टोयोटा हायरायडर सारख्या देशातील काही सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्ही मॉडेल्सना जोरदार टक्कर देते .
यात १.५ लीटर पेट्रोल इंजिन आहे, जे १२१Hp आणि १४५Nm टॉर्क जनरेट करते. यात ६-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि ७-स्पीड CVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय आहे. हे तेच इंजिन आहे जे होंडा सिटी सेडानमध्ये देखील आढळते. Honda कडून सांगण्यात आले की SUV चे मॅन्युअल गिअरबॉक्स व्हेरिएंट १५.३१ किमी प्रति लीटर पर्यंत मायलेज देते आणि CVT प्रकार प्रति लीटर १६.९२ किमी पर्यंत मायलेज देते.
एसयूव्हीमध्ये ४० लिटरची इंधन टाकी आहे. यात एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, १६-इंच स्टील व्हील्स, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, १०.२५-इंच टचस्क्रीन, ६ एअरबॅग्ज, ऑटो-डिमिंग इंटीरियर डे/नाईट मिरर, ८ स्पीकर, लेदरेट ब्राउन अपहोल्स्ट्री आणि सॉफ्ट अपहोल्स्ट्री यांचा समावेश आहे.
होंडा एलिव्हेट एकूण ७ सिंगल कलर व्हेरिएंटमध्ये सादर केली आहे. त्यामध्ये प्लॅटिनम व्हाईट पर्ल, लुनर सिल्व्हर मेटॅलिक, ऑब्सिडियन ब्लू पर्ल, रेडियंट रेड मेटॅलिक, गोल्डन ब्राऊन मेटॅलिक, मेटिओरॉइड ग्रे मेटॅलिक आणि फिनिक्स ऑरेंज पर्ल या रंगाचा समावेश असेल. या मध्यम आकाराच्या एसयूव्हीची किंमत १०.९९ लाख रुपयांपासून सुरू होते आणि १५.९९ लाख रुपयांपर्यंत जाते.